"बरं झालं पाठ सोडलीस"; राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर कॉमेडियन रोहन जोशीची आक्षेपार्ह कमेंट

रोहन जोशीने आक्षेपार्ह भाषा वापरल्याने त्याला ट्रोल करण्यात येतय

Updated: Sep 21, 2022, 07:23 PM IST
"बरं झालं पाठ सोडलीस"; राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर कॉमेडियन रोहन जोशीची आक्षेपार्ह कमेंट title=

मुंबई : कॉमेडीयन राजू श्रीवास्तव (Comedian Raju Srivastav Death) यांचं बुधवारी सकाळी निधन झालं आहे. पंतप्रधान मोदी (PMModi) यांच्यापासून बॉलीवूड कलाकारांपर्यंत सर्वांनीच राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर कॉमेडियन रोहन जोशी (rohan joshi) हे नाव सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सोशल मीडियावर रोहन जोशीला (rohan joshi) ट्रोल करण्यात येत आहे. राजू श्रीवास्त यांच्या निधनानंतर (Comedian Raju Srivastav Death) रोहन जोशीने आक्षेपार्ह भाषा वापरल्याने त्याला ट्रोल करण्यात येत आहे. बरं झालं पाठ सोडलीस अशा शब्दात रोहन जोशीने प्रतिक्रिया दिलीय. यानंतर त्याच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. (Comedian Rohan Joshi Offensive Comment After raju Srivastava Death)

राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर सर्वजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. स्टँड अप कॉमेडियन अतुल खत्रीनेही त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तुम्ही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहात. तुमची आठवण येईल. भारतीय स्टँड अप कॉमेडीचे मोठं नुकसान झालं आहे, असं अतुल खत्रीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

याच पोस्टच्या कमेंटमध्ये लेखक आणि विनोदी अभिनेता रोहन जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही काहीही गमावले नाही. "कामरा असो, रोस्ट असो किंवा बातम्यांमध्ये धावणारा अन्य विनोदी कलाकार असो. राजू श्रीवास्तव यांनी नवीन विनोदवीरांना शिव्याशाप देण्याची प्रत्येक संधी साधली. ते प्रत्येक वृत्तवाहिनीवर जात असे. जेव्हा-जेव्हा त्यांना नवीन कलाप्रकार बघण्यासाठी बोलावले जायचे. त्यांना तो आक्षेपार्ह वाटला कारण त्यांना तो कलाप्रकार समजला नाही. ते स्वतः काही चांगले विनोद सांगू शकत होते. पण त्यांना कॉमेडीचा भाव कळत नव्हता किंवा कोणी तुमच्याशी सहमत नसले तरी तुम्ही त्यांच्या हक्कांचे रक्षण केले पाहिजे असा समजही नव्हता. बरं झालं!," असं रोहन जोशीने म्हटलं आहे.

atul khatri on Raju Srivastav

रोहन जोशच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर वातावरण तापलं आहे. एका युजरने ट्विटरवर, रोहन जोशी यांचे अभिनंदन. तुम्ही एका पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये राजू श्रीवास्तव यांना चांगले आणि वाईट म्हटले आणि तुम्ही सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहात. राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या आयुष्यात हे यश मिळवले आहे, असा टोला लगावला आहे.

लाज वाटायला हवी

आणखी एका युजरने ट्विट करत, एखाद्याच्या मृत्यूचा आनंद साजरा करताना लाज वाटायला हवी. ते स्वत:वर कोणतीही टिप्पणी किंवा टीका सहन करू शकत नाहीत परंतु असहिष्णू असल्याबद्दल ते राजू श्रीवास्तव यांना शिव्या देत आहेत, असं म्हटलं आहे.

दरम्यान, या टीकेनंतर रोहन जोशी याची आक्षेपार्ह कमेंट अतुल खत्री यांच्या पोस्टवरून हटवण्यात आली आहे.