Crime Patrol Actor Death : लोकप्रिय अभिनेता नितिन चौहानचं काल 7 नोव्हेंबर रोजी गुरुवारी मुंबईत निधन झालं. दिवंगत अभिनेता नितिन हा फक्त 35 वर्षांचे होते. नितिननं आजवर अनेक शो आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. नितिननं अचानक अखेरचा श्वास घेतल्यानं सगळ्यांना आश्चर्य झालं. नितिनच्या एका सह-कलाकारानं सांगितलं की कथितपणे त्यानं आत्महत्या केली होती.
खरंतर त्याच्या एका माजी सहकलाकारानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही दु:खद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. नितिन हा उत्तरप्रदेशच्या अलीगडचा राहणारा होता. त्यानं आजवर रिअॅलिटी शो स्पिल्ट्सव्हिला 5 आणि दादागिरी 2 या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. तर नितिनला खरी ओळख ही दादागिरी 2 हा शो जिंकल्यानंतर मिळाली होती. त्यानंतर नितिननं त्याच्या अभिनयाच्या जोरावर सगळ्या प्रेक्षकांची मने जिंकली. नितिननं आजवर ‘जिंदगी डॉट कॉम’, ‘क्राइम पेट्रोल’ आणि ‘फ्रेंड्स’ सारख्या शोमध्ये काम केलं आहे इतकंच नाही तर त्याला खरी ओळख ही कोणत्या मालिकेमुळे मिळाली असेल तर तो ‘क्राइम पेट्रोल’ हा शो आहे.
नितिननं सगळ्यात शेवटी 2022 मध्ये छोट्या पडद्यावरील 'तेरा यार हूं मैं' शोमध्ये काम केलं होतं. या मालिकेत त्याचे सह-कलाकार सुदीप साहिर आणि सायंतनी घोषनं त्याच्या निधनाच्या बातमी सगळ्या चाहत्यांना दिली. त्यानं हे देखील सांगितलं की त्यांच्याकडे कोणतीही माहिती नाही. तर त्याचा माजी सह-कलाकार विभूति ठाकुरच्या एका पोस्टनुसार, नितिननं कथितपण आत्महत्या केली आहे. त्याच्या निधनाविषयी कळल्यानंतर त्याचे वडील हे मुंबईला पोहोचले आहेत आणि ते नितिनं पार्थिव हे अलीगढला घेऊन जाणार आहेत. सध्या यावर पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पोलिस या प्रकरणात तपास करत आहेत.
हेही वाचा : अभिनेता सुनील शेट्टीला दुखापत; पोस्ट शेअर करत अभिनेत्यानं केला खुलासा, म्हणाला 'शुटिंगदरम्यान...'
नितिननं 'दादागिरी 2' जिंकल्यानंतर एमटीवीच्या 'स्प्लिट्सविला 5', 'जिंदगी डॉट कॉम', 'क्राइम पेट्रोल' आणि 'फ्रेंड्स' सारख्या कार्यक्रमांमध्ये काम केलं आहे. नितिनच्या जवळचा मित्र कुलदीपनं सांगितलं की पुढच्या महिन्यात ते खातू श्याम जी यांच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार होते. नितिनं हौशी होता आणि त्याला फिरण्याची आवड होती. गेल्या महिन्यातच त्यानं राजस्थानमध्ये जाण्यासाठी प्लॅन बनवला होता.