पाकिस्तान : मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिमची गर्लफ्रेन्ड अभिनेत्री मेहविश हयातने पाकिस्ताननी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत इंन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. मेहविशने फोटो शेअर करत मेहविशने कॅप्शनमध्ये फक्त राष्ट्रध्वज फडकवणे पुरेसे नाही. जर नागरिकांना त्यांच्या स्वप्नातल्या पाकिस्तानला प्रत्यक्षात बदलायचे असेल तर त्यांनी 'त्यांच्या पूर्वजांच्या आदर्शांचे पालन केले पाहिजे'. असं लिहिलं आहे. सोबतचं तिने स्वत:चा एक फोटो देखील पोस्ट केला.
पण स्वतःचा फोटो पोस्ट करणं मेहविशला महागात पडलं आहे. सोशल मीडियालर मेहविशला ट्रोल केलं आहे. मेहविशचा फोटो पाहिल्यानंतर तिच्या ब्राच्या रंगावरून तिला ट्रोल केलं जात आहे. यावर मेहविशने ट्रोलर्सना सोशल मीडियावर सडेतोड उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, 'काही लोकांच्या कमेन्टमुळे मी निराश आहे.'
पुढे मेहविश म्हणाली, 'लोक माझ्या ब्राच्या रंगावर कमेन्ट करत आहेत. रंग कोणता याच्याशी तुमचा काही संबंध नाही. कृपा करून असं करू नका. ' सध्या तिची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. मेहविशबद्दल सांगायचं झालं तर, एका आयटम साँगनं सुरुवात करणारी महविश पाहता पाहता कराचीमध्ये असणाऱ्या दाऊदच्या संपर्कात आल्याचं म्हटलं जातं.
कराचीमधील मोठ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतरच तिच्या वाट्याला अनेक मोठ्या चित्रपटांचे प्रस्तावही आले. पाहता पाहता तिची लोकप्रियता वाढण्यासोबतच देशाच्या राजकीय वर्तुळातही महविशच्या नावाची चर्चा सुरु झाली. सध्या मात्र महविश चर्चेत आहे ते म्हणजे दाऊदशी जोडल्या जाणाऱ्या तिच्या बहुचर्चित नात्यामुळं.