तब्बल 400 कोटी रुपयांत विकला गेला देव आनंद यांचा बंगला, नवीन मालकाचा प्लॅन वेगळाच

Dev Anand House Sold: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे देव आनंद यांची. त्यांचा 73 वर्ष जूना बंगला पाडून त्याजागी 22 मजली टॉवर उभा राहणार असल्याची बातमी समोर येते आहे. चला तर मग पाहुया की नक्की ही डील आहे तरी काय? 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 19, 2023, 08:08 PM IST
तब्बल 400 कोटी रुपयांत विकला गेला देव आनंद यांचा बंगला, नवीन मालकाचा प्लॅन वेगळाच title=
dev anand 73 year old bunglow will be sold and 22 storey tower is going build up for 400 crore says reports

Dev Anand House Sold: घरं हे आपल्या सर्वांसाठी फारच खास असतं त्यातून आपल्या आयुष्यात कधी ना कधी या घराला गुडबाय करण्याची वेळ ही येतेच येते. सध्या अशाच एका ज्येष्ठ अभिनेत्याच्या बंगल्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्यांचा बंगला हा त्यांच्या मुलांनीच विकण्याचा निर्णय घेतला आहे. हा बंगला पाडून त्याच्याजागी 400 कोटींचा टॉवर उभा राहणार आहे. त्यामुळे यावेळी याची जोरात चर्चा रंगलेली आहे. आम्ही ज्या ज्येष्ठ अभिनेत्याबद्दल बोलतोय त्यांचे नावं आहे देवानंद.

यावेळी चक्क त्यांच्या घराच्या जागी मोठा आलिशान टॉवर उभा होणार आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी समोर आलेल्या माहितीनूसार असे कळते की, देवानंद यांच्या या घराला विकायची परवानगी खुद्द त्यांच्या मुलांनी दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया की नक्की हे प्रकरण आहे तरी काय? 

हा बंगला देव आनंद यांचा फारच खास बंगला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, ते या घरात 40 वर्षे राहत होते. त्यानंतर हे घरं हे असंच रिकामं पडलेलं होतं. त्यांचा मुलगा सुनील हा अमेरिकेत राहत असतो. त्यांची मुलगी ही उटीमध्ये राहते. 2011 सालीच देवानंद यांचे निधन झाले त्यामुळे या घराकडे पाहायला तसं म्हणायला गेलं तर कोणीच नव्हतं. एका जून्या इंटरव्ह्यूमध्ये देवानंद यांनी त्यांच्या जुन्या एका मुलाखतीत देवानंद आपल्या या जुन्या घराबद्दलही बोलले होते. तेव्हा ते म्हणाले होते की, हे घरं त्यांनी 1950 साली बांधले होते. त्यामुळे त्यावेळी आजूबाजूला फक्त जंगलचं होते असं ते म्हणाले. त्यामुळे आपल्याला कल्पना येईल की त्यांची या घराशी किती आठवणी जोडलेल्या असतील. 

हेही वाचा : ज्या चाळीत लहानाचे मोठे तेथे अचानक पोहोचले जॅकी श्रॉफ, मानेवर रुमाल ठेवण्याचे रहस्यही उलगडले

हिंदूस्थान टाईम्सनं दिलेल्या रिपोर्टनुसार, देव आनंद यांचा हा बंगला जुहू येथे आहे. हे घरं एका रियल इस्टेट कंपनीला देण्यात आली आहे. याची डीलही झाली आहे. सध्या या घराचे जे काही कागदोपत्री काम आहे ते सुरू आहे. साधारणपणे 340-400 कोटी रूपयांमध्ये हा बंगला विकला गेला आहे. माधुरी दीक्षित आणि डिंपल कपाडियाही या बंगल्यात राहायच्या समोर आलेल्या माहितीनुसार, असे कळते की, या बंगल्याच्या जागी 22 मजली टॉवर उभा राहणार आहे.