मुंबई : हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझैन खान आणि अर्सनाल गोनी बॉलिवूड कॉरिडॉरमध्ये नेहमी चर्चेत असतात. दोघं एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहेत. या सगळ्यामध्ये एक बातमी समोर येतेय की, सुझैन आणि अर्सनालने लग्न केलं आहे. आता या सगळ्या बातम्यां दरम्यान या सगळ्या चर्चेत किती खरेपणा आहे याबद्दल स्वत: अर्सनालने खुलासा केला आहे.
एका मुलाखतीमध्ये बोलताना अर्सनाल म्हणाला की, ''माझ्या पर्सनल लाईफबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही. मला नाही माहिती की याबद्दल बाहेर कोण काय बोलत आहे. आणि त्यांना याबद्बल कसं समजलं. मात्र मलाही जाणून घ्यायचं आहे की, हा निर्णय कोणी घेतला आहे.''
अर्सनालने पुढे सांगितलं की, माझी पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ खूप मस्त चालली आहे. मी माझ्या पर्सनल लाईफवर उत्तर देत बसायला बांधिल नाहीये. मी माझं आयुष्य शो ऑफ करु ईच्छित नाही. जर मी एक एक्टर असलो. तर मला माझी पर्सनल लाईफ असू शकत नाही का? मी माझं आयुष्य सगळ्यांसमोर नाही ठेवू शकतं.
अर्सनाल गोनीने पुढे सांगितलं की, सध्या तो आपल्या कामावर फोकस करु ईच्छितो. आणि आपल्या अपकमिंग प्रोजेक्ट्ससाठी तो खूप एक्साइटेड आहे. जोपर्यंत लग्नाचा प्रश्न सगळ्यांना पडतोय, तिथपर्यंत अर्सलान गोनीने होकारही दिलेला नाही आणि नाकारला नाही. सुझैन अनेकदा सोशल मीडियावर अर्सलानसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. दोघंही आपलं आयुष्य मोकळेपणानं जगत आहेत आणि त्यांनी आपलं नातं जगासमोर मांडलं आहे.