प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सेटवर गंभीर जखमी; चेहरा खराब झाल्याने चाहते चिंतेत

बॉलिवूड अभिनेत्रीने जखमी अवस्थेतील फोटो शेअर करुन तिच्या चाहत्यांना धक्का दिला आहे. तिचे चाहते तिची ही अवस्था पाहून चितेंत आहेत. ती लवकर बरी होण्यासाठी तिचे चाहते प्रार्थना करताना दिसत आहेत.

Updated: Mar 15, 2023, 06:44 PM IST
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सेटवर गंभीर जखमी; चेहरा खराब झाल्याने चाहते चिंतेत title=

Divya Khosla Kumar Injured : अभिनेत्री-दिग्दर्शिका दिव्या खोसला त्यांनी अनेक अल्बममध्ये काम केले असून चित्रपटांचे दिग्दर्शनही केलं आहे. सध्या दिव्या तिच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, दिव्याला तिच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाल्याची बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टावर जखमी अवस्थेतील अनेक फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री-दिग्दर्शिका दिव्या खोसला कुमार तिच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाली. याबाबतची माहिती, अभिनेत्रीने स्वतः तिच्या दुखापतींचे अनेक फोटो तिच्या इंस्टा वर शेअर केले आहेत. अभिनेत्री-दिग्दर्शिका दिव्या खोसला कुमार हे बॉलिवूडमधलं खूप प्रसिद्ध नाव आहे.

नुकतेच दिव्या खोसला कुमारने तिच्या मोस्ट अवेटेड सिक्वेल 'यारियां 2' च्या शूटिंगबद्दल माहिती दिली होती. चित्रपटाचं शूटिंग यूकेमध्ये होणार आहे. असं तिने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली शूट लोकेशनवरुन फोटो  शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ''माझ्याकडे असे अद्भुत फॉलोअर्स आहेत ज्यांना माझ्याबद्दल सगळं काही माहित असतं.

जेव्हा मी माझ्या शेवटच्या पोस्टमध्ये विचारलं होतं की, मी कुठे आहे. तेव्हा तुमच्यापैकी बहुतेकांना हे आधीच माहित होतं. होय, माझ्यासाठी अगदी जवळ असलेल्या चित्रपटासाठी यूकेमध्ये आहे... तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची मला खूप गरज आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी प्रतीक्षा करू शकत नाही...''

दिव्याने इंस्टावर शेअर केले जखमी अवस्थेतील फोटो
दिव्या खोसला कुमारने इस्टाग्रामवर फोटो शेअर करुन आपण जखमी झाल्याची माहिती दिली. यामध्ये तिच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याचं तिने सांगितलं. चेहऱ्याला जखम झाल्याने तिचा चेहऱ्यावर रेड मार्क आले होते. तिचा डोळाही सुजल्याचं या फोटोमध्ये दिसतं. फोटो शेअर करत दिव्याने कॅप्शनमध्ये लिहीलं की, ''माझ्या आगामी प्रोजोक्टसाठी एक एक्शन सिक्वेन्स शूट करताना मला जोरात चक्कर आली. मात्र मस्ट गो ऑन. मला तुमच्या आशिर्वादांची आणि हीलिंग एनर्जीची खूप गरज आहे. दिव्याचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर फॅन्स त्याची लवकर बरं होण्याची वाट पाहत आहेत''. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दिव्या कुमार ही प्रसिद्ध अभिनेत्री आणि चित्रपट दिग्दर्शक/निर्माता आहे. दिव्याने आत्तापर्यंत अनेक जाहिराती आणि म्युझिक व्हिडिओ दिग्दर्शित केले आहेत. दिव्याचा जन्म 20 नोव्हेंबर 1981 रोजी दिल्लीत एका पंजाबी कुटुंबात झाला. दिव्या तिच्या करिअरसाठी दिल्लीहून मुंबईत शिफ्ट झाली. दिव्याने दिग्दर्शक/निर्माता भूषण कुमारशी लग्न केलं आहे, तिला एक मुलगाही आहे.