चुकूनही 'या' 5 वेब सीरिज पाहू नका, वेळ जाईल फुकट

कोणत्या आहेत, त्या पाच वेबसीरिज, ज्या पाहण्यात बिलकूल वेळ वाया घालवू नका  

Updated: Feb 27, 2022, 11:01 AM IST
चुकूनही 'या' 5 वेब सीरिज पाहू नका, वेळ जाईल फुकट  title=

मुंबई : सध्याचा काळ बेब सीरीज आहे... असं म्हणायला काही हरकत नाही. कोरोना काळात जेव्हा सिनेमे प्रदर्शित होत नव्हते. तेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक अशा सीरिज आहेत. ज्यांचा पहिला भाग पाहिल्यानंतर दुसरा भाग पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचते. पण अशाही काही सीरिज आहेत, ज्या पाहिल्यानंतर वेळ फुकट गेल्याची भावना मनात येईल... आशाचं 5 सीरिजबद्दल आपण जाणून घेवू

'द एपांयर'
सीरिजमध्ये अनेक मोठ्या कलाकारांची मेजवानी एकत्र पाहायला मिळाली. तुम्हाला वाटत ही सीरिज पाहावी, तर थांबा... सीरिज प्रमाणापेक्षा अधिक स्लो आहे. त्यामुळे पहिला एपिसोड पाहिल्यानंतर दुसरा एपिसोड पाहाण्याची इच्छा होणार नाही. 

'ओके कंप्यूटर' 
'ओके कंप्यूटर' सीरिज चुकूनही पाहू नका. सीरिजची कथा 9 - 10 वर्षांनंतरची आहे. सीरिजमध्ये क्राईम दाखवण्यात आला आहे. म्हणून सीरिज पाहण्यात वेळ वाया घालवू नका. 

'रामयुग'
'रामयुग'चं पोस्टर पाहून जर तुम्हाला सीरिज पाहाण्याची इच्छा होत असेल, तर थांबा.. सीरिजमध्ये रामायणाची कथा वेगळ्या पद्धतीत दाखवण्यात आली आहे. 

'मैं हीरो बोल रहा हूं'
नावाप्रमाणेच ही वेब सिरीज एका छोट्या शहरातील मुलावर आधारित आहे. या मुलाला मुंबईचा डॉन बनायचे आहे, असं वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे.

'बिसात: खेल शतरंज का'
वेब सिरीजची कथा मनोचिकित्सक कियाना वर्माची आहे जिचे लग्न अभिजीत नावाच्या डॉक्टरशी होते. पण कियाना तिच्या पेशंटसोबत इतकी भावूक होते की तिच्याच जीवावर परिणाम होतो.