Ranveer Singh Grandparents: सध्या इन्टाग्रामवर चर्चा आहे ती म्हणजे रणवीर सिंग याची. त्याचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय झालेला आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा आहे. सध्या त्यानं इन्टाग्रामवर आपल्या आजोबांचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळे त्याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. त्याच्या आजोबांचा हा व्हिडीओ सध्या सर्वत्र गाजतो आहे. त्यामुळे त्यांच्या आजोबांचीही चांगलीच चर्चा रंगलेली आहे. रणवीर सिंग म्हटलं की आपल्यासमोर येतो तो म्हणजे एनर्जेटिक अभिनेता यावेळी त्याच्या या आजोबांचा व्हिडीओ पाहून कळतंच आहे की त्याला या एनर्जीची देणगी कुठून मिळाली असेल. त्याचे आजोबा हे 93 वर्षांचे आहे. त्यामुळे रणवीरनंही त्याच्या या व्हिडीओवर असेच म्हटलं आहे. त्यानं म्हटलं आहे की, माझे आजोबा 93 वर्षांचे आहेत आणि अजूनही ते एव्हरग्रीन आणि रॉकींग आहेत. बॉलिवूडच्या इंडस्ट्रीतील कलाकारांनीही त्याच्या या व्हिडीओवर चर्चांचा पाऊस पाडला आहे.
यावेळी त्याच्या आजोबांची चर्चा रंगलेली असली तरीसुद्धा आता चर्चा आहे ती म्हणजे तिच्या आज्जीची. आपल्यापैंकी अनेकांना हे माहिती नसेलच की रणवीरची आज्जी ही लोकप्रिय अभिनेत्री होती. एकेकाळी त्या ब्लॅक एण्ड व्हाईटच्या जमान्यातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. 2010 पासून रणवीर सिंगनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच असंच वाटतं आलं आहे की तोही एक आऊटसाईडर आहे. परंतु तसे नसून त्याची आज्जीही फार मोठी लोकप्रिय अभिनेत्री होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेलच की त्याही लोकप्रिय अभिनेत्री होत्या. तुम्हाला जाणून कदाचित आश्चर्य वाटेल परंतु सोनम कपूरशीही त्यांचे फार खास नातं आहे. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की रणबीवरच्या आज्जी या कोण होत्या? आणि त्या कोणत्या अभिनयासाठी ओळखल्या जात होत्या?
हेही वाचा - वजनावरून ऐकवलं, कोणी म्हटलं प्रेगंन्ट; मराठी अभिनेत्रीला वनपीस घालून रील करणं पडलं महागात!
रणवीर सिंग यांच्या वडिलांचे नाव हे जगजीत सिंह भगवानी असं आहे. त्यांच्या मातोश्री या चांद बर्क या फार लोकप्रिय अभिनेत्री होत्या. ब्लॅक अॅण्ड व्हाईट काळातील त्या फार लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी पंजाबी चित्रपटांतून त्यांनी पदार्पण केले होते. त्यामुळे त्यांची चर्चा होती. त्या नृत्यातही फार पारंगत होत्या. त्यांना पंजाबी सिनेमांमधून फार लोकप्रिय मिळाली होती म्हणून त्यांना 'लिली ऑफ पंजाब' असेही नावं देण्यात आले होते. त्यांना राज कपूर यांनी बॉलिवूडमध्ये लॉन्च केले होते. 1954 साली आलेल्या 'बूट पॉलिश' या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दादा सुंदर सिंग भगवानी यांची बहीण सोनम कपूरची आई सुनीताच्या आईचे भाऊ आहेत.