Harry Potter actor Leslie Phillips Died: 'हॅरी पॉटर' (Harry Potter) सिनेमाच्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे. आणखी एका 'Harry Potter' फेम अभिनेत्याचं निधन झालं आहे. ज्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 'हॅरी पॉटर' सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या ब्रिटीश अभिनेता लेस्ली फिलिप्स (Leslie Phillips) याचं निधन झालं आहे. वयाच्या 98 वर्षी त्यांचं निधन झालं. गेल्याकाही महिन्यांपासून ते आजारी होते. आजाराशी झुंज देताना अखेर त्यांनी जगाला शेवटचा श्वास घेतला. (leslie phillips and harry potter)
झोपेत लेस्ली फिलिप्स यांनी घेतला अखेरचा श्वास
लेस्ली फिलिप्स यांचं निधन झोपेत झाल्याची माहिती त्यांच्या एजेन्टने दिली. लेस्ली फिलिप्स यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या अचानक जाण्याने सिनेसृष्टी आणि चाहत्यांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
लेस्ली यांचा जन्म 20 एप्रिल 1924 साली लंडनमध्ये झाला होता. त्यांनी एकून 200 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण आता मात्र त्यांनी चाहत्यांना रडवून जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. (leslie phillips net worth)
लेस्ली यांच्या पत्नीला मोठा धक्का
पती लेस्ली फिलिप्स यांच्या निधनाचा त्यांच्या पत्नीला मोठा धक्का बसला आहे. पतीच्या निधनानंतर त्या दुखः व्यक्त करत म्हणाल्या, 'मी एका प्रचंड चांगल्या पती गमावलं आहे. प्रेक्षकांनी एका खऱ्या अभिनेत्याला गमावलं आहे... कोठेही गेल्यानंतर त्यांना भरभरुन प्रेक्षकांचं प्रेम मिळायचं...' अशी भावना लेस्ली यांच्या पत्नीने व्यक्त केल्या. (leslie phillips wife)
'कॅरी ऑन' फेम लेस्ली फिलिप्स (leslie phillips carry on)
हॅरी पॉटर व्यतिरिक्त लेस्ली फिलिप्सला 'कॅरी ऑन' सिनेमासाठी देखील चर्चेत होते. सिनेमातील त्यांचे डायलॉग आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहेत.