मुंबई : हॉलिवूड अभिनेत्री पामेला एंडरसनने शुक्रवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहलं आहे. या पत्रामध्ये तिने शाकाहरी आहारास प्राधान्य देण्याची विनंती पंतप्रधान मोदींकडे केली. 'बेवॉच' आयकॉन आणि 'बिग बॉस'च्या घरातील अतिथी राहिलेली स्टार पामेला एंडरसन मोदींना पत्र लिहीले आहे. 'पेटा' (People for the Ethical Treatment of Animals)द्वारे तिने हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले.
सर्व सार्वजनिक बैठक किंवा कार्यक्रमांमध्ये फक्त शाकाहरी आहाराचा समावेश करण्यात यावा असे या पत्रात नमुद करण्यात आले आहे.
सध्या दिल्लीत हवेतील प्रदूषणाने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हवामानात सतत होणाऱ्या बदलांच्या विरोधात भारताच्या लढाईचे नेतृत्व करण्यासाठी सरकारी बैठका आणि कार्यक्रमांमध्ये केवळ शाकाहारी भोजन देण्याचे आवाहन तिने केले.
Letter to India PM Narendra Modi https://t.co/hElLXiC4ib #India
— Pamela Anderson (@pamfoundation) November 29, 2019
न्यूझीलंड, चीन आणि जर्मनी या देशांप्रमाणे फक्त शाकाहरी अन्नाचा आपल्या आहारात समावेश करण्याचा आग्रह पेटा संस्थेच्या अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केला आहे.
शिवाय, पामेला एंडरसनने म्हणते, 'मी तुम्हाला आग्रह करते, तुम्ही देखील दाखवून द्या की अन्य देशांच्या तुलनेत भारत देश त्यांच्या बरोबर किंवा त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे.' मांस, आंडे, डेअरी यांसाठी प्रण्यांचं संरक्षण करणं फार महत्त्वाचं असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दिल्लीमध्ये प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. प्रदूषणामुळे दिल्लीत काही दिवसांकरता शाळांना देखील सुट्टी देखील जाहीर करण्यात आली. तेथील रहिवासी दोखील प्रदूषणामुळे फार त्रस्त आहेत. आपण तरी मास्क लावू शकतो. पण प्रणी मास्क लावू शकत नाही. अशा प्रकारे तिने प्रण्यांविषयी चिंता व्यक्त केली.