हुबेहूब सुशांत; राखी सावंतही म्हणाली होती- तो बदला घेण्यासाठी आलाय! सत्य ऐकून बसेल धक्का

सुशांत सिंह राजपूतसारख्या सेम-टू-सेम दिसणारी व्यक्तीला पाहून सगळेच हैराण दिसत आहेत. अनेकजण सुशांत सिंह परत आला असाही दावा केला आहे. मात्र व्हिडिओत दिसणारा हा तरुण सुशांत सिंह राजपूत नसून त्याचा लूकलाईक आहे. 

Updated: Aug 8, 2023, 04:41 PM IST
हुबेहूब सुशांत; राखी सावंतही म्हणाली होती- तो बदला घेण्यासाठी आलाय! सत्य ऐकून बसेल धक्का title=

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपुतने २०२० मध्ये राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आणि त्याच्या या अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला. सुशांतचा खूप मोठा चाहता वर्ग होता. त्याच्या जाण्याने सिनेसृष्टी हादरली होती. मात्र सध्या काही व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये सुशांत सिंह राजपूतसारखी एक व्यक्ती हुबेहूब दिसत आहे. हे  व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या तरुणाचे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहते आणि नेटकरी चांगलेच हैराण झाले आहेत. 

सुशांत सिंह राजपूतसारख्या सेम-टू-सेम दिसणारी व्यक्तीला पाहून सगळेच हैराण दिसत आहेत. अनेकजण सुशांत सिंह परत आला असाही दावा केला आहे. मात्र व्हिडिओत दिसणारा हा तरुण सुशांत सिंह राजपूत नसून त्याचा लूकलाईक आहे.  अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रमाणे हुबेहूब दिसणाऱ्या व्हायरल तरुणाचं नाव डोमिन अयान आहे.  जर तुम्ही त्याला पाहिलं नसेल तर तुम्हालाही त्याला पाहून आश्चर्याचा धक्का नक्की बसू शकतो. कारण डोमिन अयानचा चेहरा आणि लूक्स अगदी सुशांतसारखे असल्याने चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.

डोमिन अयाने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत.  यामध्ये तुम्ही पाहू शकता की, डोमिन अयानचा चेहरा, स्टाईल, उंची अगदी सुशांत सिंह राजपूतसारखी असल्याचं व्हायरल फोटो आणि व्हिडीओंमधून दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल की, दोन व्यक्ती इतके एकसारखे कसे दिसू शकतात. या व्हिडीओवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकजण त्याच्या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

एकाने कमेंट करत म्हटलंय की, तुला पाहून सुशांतची आठवण येतेय. तर अजून एकाने कमेंट करत म्हटलंय की, हा आपला भाऊ सुशांत सारखा दिसतो ना? तर अजून एकाने एखाद्यात एवढं साम्य कसं काय? असं म्हटलंय. तर अजून एकाने लिहीलंय,  भाऊ तुम्ही कोठून आहात हे आम्हाला कळू शकतं का? पण तुम्ही जिथले असाल तुम्हाला आमच्या बिहारमध्ये सुशांत सरांसारखं प्रेम मिळेल. डोमिन अयानचा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसलाय. सध्या सगळीकडे डोमिनच्या फोटो व्हिडिओंची जोरदार चर्चा आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काहींनी त्यांच कौतुक केलं असलं तरी अनेकांनी मात्र त्याच्या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रीया दिल्या आहे.  एका युजरने कमेंट करत लिहिलं की हा तरुण AI चा वापर करुन सुशांत सिंह राजपूत सारखा दिसण्याचा प्रयत्न करत आहे. तर  AI टेक्नॉलॉजीचा वापर केल्याचं म्हणत अनेकांनी त्याच्या व्हिडिओवर नाराजी व्यक्त केली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यूजर्स या व्हिडिओवर जोरदार कमेंट करत असतानाच राखी सावंतनेही व्हायरल भयानीच्या शेअर केलेल्या व्हिडिओवर अशा पद्धतीने कमेंट करत लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. राखीने कमेंट करत दोन प्रतिक्रिया दिल्या आहेत. पहिल्या कमेंटमध्ये लिहिलं,  'तो बदला घेण्यासाठी परत आला आहे.' दुसऱ्या कमेंटमध्ये लिहिलं- 'ओएमजी... हा अगदी सेम टू सेम आहे.'