शिल्पा शेट्टी बदनामी प्रकरण : मुंबई हायकोर्टाकडून शिल्पाला दिलासा नाही

हायकोर्टाने वकिलाला असंही सांगितलं आहे, की शिल्पाच्या पतीविरोधात केस सुरु आहे.

Updated: Jul 30, 2021, 05:23 PM IST
शिल्पा शेट्टी बदनामी प्रकरण : मुंबई हायकोर्टाकडून शिल्पाला दिलासा नाही title=

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मुंबई हायकोर्टात अनेक मीडिया एजेन्सी विरोधात बदनामीचा दावा दाखल केला. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने विचारले आहे की जर माध्यमांनी सूत्रांचा अहवाल देत बातम्या चालवल्या असतील, तर ते चुकीचे कसे काय आहे?

हायकोर्टाने वकिलाला असंही सांगितलं आहे, की शिल्पाच्या पतीविरोधात केस सुरु आहे आणि हे कोर्ट कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही. तुमचा ग्राहक कोणीही असू शकतो, पण बदनामीसाठी एक कायदा आहे.

शिल्पाच्या वकिलांनी न्यायालयाला काय सांगितलं?

शिल्पाच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, मीडिया ज्या बातम्या चालवत आहे , त्याचा परिणाम शिल्पाच्या मुलांवर होतो आहे. तिच्या रडण्यावरुन कळतं की एक माणूस आहे. यावर कोर्टाने वकीलाला विचारलं की, आता तुम्ही अशी अपेक्षा करता का ? की कोर्टाने बसून प्रत्येक बातमीच्या मागील सूत्रांबाबतची चौकशी करावी.

न्यायालयाने पुढे सांगितलं की, पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार केलेल्या बातम्या, अपमानास्पद नाही.