Sindhudurga Fly Boarding : हवेच्या दाबावर समुद्राच्या पाण्यावर तरंगण्याचा अनुभव म्हणजे फ्लायबोर्डिंग (Fly Boarding). जल क्रिडा प्रकारात मोडणारा हा साहसी खेळ परदेशात खूपच लोकप्रिय आहे. सोशल मिडियावर फ्लाय बोर्डिंगचे अनेक थरारक व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. Fly Boarding या थरारक क्रिडा प्रकाराच अनुभव आपण आपल्या महाराष्ट्रातही घेऊ शकतो. कोकणातील समुद्र किनाऱ्यावर Fly Boarding क्रिडा प्रकार सुरु करण्यात आला आहे. यामुळे कोकणात फिरायला गेलात तर या Fly Boarding चा थरारक अनुभव नक्की घ्या. जाणून घेऊया कोकणातील कोणत्या समुद्र किनाऱ्यावर Fly Boarding करता येऊ शकते.
कोकणातील सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनारे नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतात. चमकणारे समुद्र किनारे, नारळ फोफळीच्या बागा अफाट सौंदर्य असलेला निसर्गरम्य परिसर. याच कोकणच्या पर्यटनात आता साहसी क्रिडा पर्यटनाची भर पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, कुणकेश्वर, वेंगुर्ले व मालवण या समुद्र किनाऱ्यावर थ्रीलिंग वॉटर स्पोर्टचा थरारक अनुभव घेता येऊ शकतो. बनाना राईड जेट, स्की पॅरासिलिंग, स्कुबा डायव्हिंग यासारखे क्रिडा प्रकार चांगलेच लोकप्रिय झाले आहे. यात आता भर पडली आहे ती Fly Boarding ची. कोकणातील समुद्र किनाऱ्यावर Fly Boarding चा थरार अनुभवता येत आहे.
मावणच्या समुद्र किनाऱ्यावर कर्ली नदीच्या संगमाजवळ पर्यटकांना Fly Boarding थरार अनुवता येई शकतो. हा क्रीडा प्रकार व्हिडिओत दिसतो तितका सोपा नाही. 20 मिनिटांचा हा साहसी क्रिडा प्रकार आहे. यात पर्यटकाला सेफ्टी जॅकेटसह सर्व सुविधा दिल्या जातात. जेट्टीवरुन एका बोटीच्या माध्यमातून समुद्राच्या मध्यभागी नेले जाते. यानंतर समुद्रातच ही बोट थांबते. पायात बुटासारखे फ्लाय बोर्डिंगचे किट घातले जाते. आणि पार्यटकाला हळू हळू समुद्रात सोडले जाते. सोबत असलेले ट्रेनर फ्लायबोर्डिंग कसं करायचं याबाबत गाईड करतात. फ्लाय बोर्डिंगच्या किटच्या माध्यमातून प्रचंड दबावाद्वारे आपण फ्लायोबर्डिंग करतो. मात्र, पाण्यात जाऊन पुन्हा समुद्राच्या वर फ्लाय करणे अत्यंत कठिण आहे. प्रत्यक्षात फ्लाय बोर्डिंगचा अनुभव खूपच थरारक आहे.