भारताला मोठं यश! 26/11 हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

Tahawwur Rana's extradition: मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा. राणाच्या भारताकडे प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 25, 2025, 10:32 AM IST
भारताला मोठं यश! 26/11 हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा title=
US Supreme Court approves extradition of Mumbai 26/11 convict Tahawwur Rana to india

Tahawwur Rana's extradition: 2008 मधील 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वुर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमिरेकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तहव्वुर राणाच्या प्रत्यर्पणास मंजुरी दिली आहे. भारताकडून कित्येक वर्षांपासून पाकिस्तानी वंशीय कॅनडाचा नागरिक असलेल्या तहव्वुर राणाच्या प्रात्यार्पणाची मागणी करत होता. अखेर आता तहव्वू राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

कनिष्ठ न्यायालयांमध्ये कायदेशीर लढाई हरल्यानंतर राणाने भारतात प्रत्यार्पणाविरोधात अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. कनिष्ठ न्यायालय आणि अनेक संघीय न्यायालयात दाद न मिळाल्याने तहव्वुर राणा अखेर सॅन फ्रान्सिसमध्ये अमेरिकेच्या न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. ही राणासाठी शेवटची कायदेशीर संधी होती. 

16 डिसेंबर रोजी यूएस सॉलिसिटर जनरल एलिझाबेध बी प्रीलॉगर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका फेटाळण्याची विनंती केली. राणाचे वकील जोशुआ एल इरेटेल यांनी 23 डिसेंबर रोजी त्याच्या उत्तरात अमेरिकन सरकारच्या शिफारशीला आव्हान दिले आणि सर्वोच्च न्यायालयात त्याची रीट स्वीकारण्याची विनंती केली होती. 

कोण आहे तहव्वूर राणा?

राणाचा जन्म आणि शिक्षण पाकिस्तानात झाले होते. त्याने थोड्या काळासाठी पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून कार्यरत होता. त्यानंतर 1997 मध्ये तो कॅनडाला गेला होता. 2009मध्ये डॅनिश वृत्तपत्राने प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दलचे एक चित्र छापल्यानंतर वृत्तपत्राचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची योजना त्याने आखली होती. या प्रकरणात शिकागो न्यायालयाने दोषी ठरवले होते.

आरोप काय?

मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रानुसार राणा दहशतवाद्यांना हल्ल्याचे ठिकाण आणि भारतात आल्यानंतर राहण्याची ठिकाणे सांगून मदत करत होता. त्यानेच हल्ल्याची ब्लू प्रिंट केली होती, असा ठपका ठेवण्यात आला आहे. राणा आणि हेडलीवर दहशतवादी कट रचल्याचा आरोप होता. मुंबई हल्ल्याचा कट रचण्यात राणाचा मोठा हात होता, असे आरोपपत्रात म्हटले आहे.