शनिवारी मुंबईतील 'या' दोन भागात पाणीपुरवठा राहणार बंद

मालाड पश्चिम येथील 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती उद्भवल्‍याने मालाड पश्चिम, गोरेगाव पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवारी बंद राहणार आहे.

शिवराज यादव | Updated: Jan 24, 2025, 10:16 PM IST
शनिवारी मुंबईतील 'या' दोन भागात पाणीपुरवठा राहणार बंद title=

मालाड पश्चिम येथील 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती उद्भवल्‍याने मालाड पश्चिम, गोरेगाव पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवारी 25 जानेवारी 2025 रोजी बंद राहणार आहे. गळती दुरुस्तीचे काम  शुक्रवारी 24 जानेवारी 2025 रोजी रात्री 10.30 ते शनिवार दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. 

मालाड पश्चिमस्थित लिबर्टी जलबोगदा येथे 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती उद्भवल्‍याचे निदर्शनास आले आहे. गळती दुरुस्तीची कार्यवाही शुक्रवारी रात्री 10.30 वाजता हाती घेण्यात  येणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे कामकाज शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालाड पश्चिम आणि गोरेगाव  पश्चिम येथील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवारी म्हणजेच 25 जानेवारी 2025 रोजी बंद राहणार आहे. 

या विभागात पाणीपुरवठा बंद  

 1) मालाड पश्चिम  - अंबुजवाडी, आजमी नगर ,जनकल्याण नगर 

 2) गोरेगाव पश्चिम - उन्नत नगर, बांगुर नगर, शास्त्री नगर, मोतीलाल नगर, सिद्धार्थ नगर, जवाहर नगर, भगतसिंग नगर, राम मंदिर मार्ग 

 संबंधित परिसरातील नागरिकांनी, पाणी काटकसरीने वापरून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.