'शूटिंग पूर्ण करूनच जायचं', म्हणत टीव्ही अभिनेत्याला निर्मात्यांकडून मारहाण, पोलिसात तक्रार दाखल

टीव्ही मालिकेच्या सेटवरील धक्कादायक प्रकार समोर आलाय. ज्यामध्ये निर्मात्यांकडून अभिनेत्याला जबर मारहाण करण्यात आलीये. 

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 24, 2025, 07:38 PM IST
'शूटिंग पूर्ण करूनच जायचं', म्हणत टीव्ही अभिनेत्याला निर्मात्यांकडून मारहाण, पोलिसात तक्रार दाखल title=

Shaan Mishra : लोकप्रिय हिंदी मालिका 'जय माँ लक्ष्मी' च्या सेटवरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मालिकेच्या सेटवर निर्मात्यांनी अभिनेत्याला जबर मारहाण केल्याची घटना समोर आलीये. मारहाणीनंतर अभिनेत्याने निर्मात्यांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केलीये. ज्यामध्ये अभिनेता शान मिश्रा याला 'जय माँ लक्ष्मी' मालिकेच्या शूटिंग दरम्यान निर्मात्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मालिकेच्या सेटवर झालेल्या बाचाबाचीनंतर हे प्रकरण पुढे वाढत गेले आणि यानंतर दोघांमध्ये भांडण सुरु झाले त्यामधूनच मारहाण झाली. 

मालिकेच्या सेटवर नेमकं काय घडलं? 

टीव्ही अभिनेता शान मिश्रा हा 'जय माँ लक्ष्मी' या मालिकेत विष्णू देवाच्या भूमिकेत दिसतो. अभिनेत्याच्या हाताला दुखापत झाल्याने त्याने निर्मात्यांकडे मालिकेच शूटिंग लवकर संपवण्याची विनंती केली होती. त्रास होत असल्यामुळे अभिनेत्याने निर्मात्यांकडे घरी जाण्यासाठी परवानगी देण्याची विनंती केली होती. यामध्ये डॉक्टरांनी अभिनेत्याला दुखापतीमुळे शूटिंग न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, अभिनेता तरी देखील शूटिंगमध्ये अडथळा येवू नये यासाठी सेटवर पोहोचला होता. कारण पुढील येणाऱ्या भागावर त्याच्या दुखापतीमुळे कोणताही परिणाम होऊ नये यासाठी तो शूटिंगसाठी गेला होता. त्यामुळे अभिनेत्याने निर्मात्यांना शूटिंग लवकर संपवण्याची देखील विनंती केली. यामुळेच दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर दोघांमध्ये मारहाण झाली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

निर्मात्याची पत्नी आणि अभिनेत्यामध्ये बाचाबाची

दरम्यान, अभिनेत्याने केलेल्या विनंतीला निर्मात्यांनी देखील सहमती दर्शविली होती. परंतु, त्यानंतर निर्मात्यांनी अभिनेता शान मिश्रा यांची ही विनंदी नाकारली. यामुळे अभिनेता आणि निर्माते यांच्यामध्ये जोरदार वाद झाला. यावेळी निर्माते मंगेश यांची पत्नी देखील त्या ठिकाणी उपस्थित होती. या वादामध्ये पत्नी देखील सामील झाली. टेलि टॉकने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्यासोबत बाचाबाची करताना दिसत आहे. त्याला त्याचे काम पूर्ण करण्यास सांगताना ती दिसत आहे. तर मालिकेचा निर्माता अभिनेत्याला मारहाण करताना दिसत आहे. तर निर्मात्याची पत्नी 'तुला जे करायचे आहे ते कर पण तुझं शूटिंग पूर्ण कर आणि मग निघून जा. तू मला काय दाखवशील. तु रोज इथे येऊन टाईमपास करून जातो' अशी निर्मात्याची पत्नी म्हणाली. ही सर्व घटना अभिनेत्याने मोबाईलमध्ये कैद केली. यावेळी निर्मात्यांनी अभिनेत्याला रेकॉर्ड करण्यापासून देखील रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पत्नीने देखील त्याच्यावर हल्ला केल्याचं म्हटले जात आहे.