Mamta Kulkarni at Mahakumbh 2025 : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आज किन्नर अखाड्यात महामंडलेश्वर झाली. 24 जानेवारी रोजी संध्याकाळी ममता ही नदीच्या संगमाच्या इथे पिंडदान करणार आहे. तर आज संध्याकाळी तिनं किन्नर अखाड्यात तिचं पट्टाभिषेक कार्यक्रम होणार आहे. ममतानं किन्नर अखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी महाराज, जूना अखाडाचे महामंडलेश्वर स्वामी जय अम्बानंद गिरी यांची देखील भेट घेतली. त्यांच्या या भेटीचे फोटो देखील समोर आले आहेत.
ममता कुलकर्णी तब्बल 25 वर्षांनंतर भारतात परतली आहे. गेल्या वर्षी अर्थात डिसेंबर 2024 मध्ये ममता पहिल्यांदा मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. तिला इतक्या वर्षांनंतर भारतात पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं. तर तिच्या चाहत्यांना आनंद झाला होता आणि ती पुन्हा कधी कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसेल अशी आशा करत होते. त्यांना आशा होती की ममता कुलकर्णी ही बिग बॉस 18 मधून पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे आणि त्यासाठीच ती भारतात आली आहे. तर या सगळ्या अफवा आणि चर्चांना पूर्णविराम लावत ममता कुलकर्णीनं सांगितलं की ती महाकुंभ 2025 चा भाग होण्यासाठी ती भारतात आली आहे.
2000 मध्ये ममता कुलकर्णीनं फक्त मुंबई नाही तर भारताला देखील रामराम केला होता. आता भारतात परतल्यानंतर ममता कुलकर्णीनं एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात तिनं भारतात परतल्यानं आनंद व्यक्त केला आहे. त्यासोबत ती म्हणाली की 'सगळ्यांना नमस्कार, मी ममता कुलकर्णी आहे आणि मी भारतात अर्थात मुंबईत, आमच्या मुंबईत तब्बल 25 वर्षांनी परतली आहे. मी 2000 मध्ये भारत सोडून गेले होते आणि 2024 मध्ये परतले आहे. मी सध्या इथे आहे आणि खूप भावूक झाले. मला कळतं नाही आहे की या भावना कशा तुमच्यापुढे मांडू.'
VIDEO | Prayagraj: Film actress Mamta Kulkarni to become Mahamandleshwar of Kinnar Akhara at Maha Kumbh.
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/J0lK8Z7fJ4
— Press Trust of India (@PTI_News) January 24, 2025
पुढे ममता म्हणाली की 'मी भावूक झाले. जेव्हा फ्लाइटमध्ये लॅन्ड केलं तर लॅन्डिगआधीच मी माझ्या आजुबाजूला पाहू लागले. मी माझ्या देशाला 24 वर्षांनंतर पाहत होते आणि मी भावूक झाले. मला अश्रू अनावर झाले. मी जशी मुंबईच्या इंटरनॅशनल विमानतळाच्या बाहेर पाय ठेवला त्यानंतर मी पुन्हा भावूक झाले.'
हेही वाचा : 'वडील सोबत नव्हते, जीवनात पुरुषाची कमी...'; लहानपणीच्या त्रासाबद्दल शाहिद कपूर स्पष्टच बोलला
ममता कुलकर्णीला 'करण अर्जुन', 'छुपा रुस्तम', 'बाजी'सोबत इतर चित्रपटांसाठी ओळखला जातो. तर 2016 मध्ये अभिनेत्रीचं नाव मोठ्या ड्रग्स प्रकरणात आलं होतं. ड्रग्स प्रकरणात दुबईच्या तुरुंगवासाची शिक्षा असलेल्या विकी गोस्वामीसोबत देखील ममता कुलकर्णीचं नाव जोडण्यात आलं होतं. भारतात परत आल्यानंतर तिनं या अफवा असल्याचं म्हटलं आहे. तिचं म्हणणं आहे की ती आध्यात्मकाकडे जात आहे.