Walmik Karad News: संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळं संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या वाल्मिक कराडबद्दल धक्कादायक खुलासे होत आहेत. त्यातच आता त्याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कराडची मालमत्ता जप्त करण्यात यावी यासाठी SIT ने अर्ज केला आहे.
SIT ने विशेष न्यायालयात कराडच्या मालमत्ता जप्तीसाठी अर्ज केला आहे. तपास यंत्रणांकडून कराडची महाराष्ट्रात किती संपत्ती आहे याची संभाव्य माहिती संकलित केली आहे. त्यामुळं कराडच्या संपत्तीची माहिती समोर येताच मालमत्ता जप्त करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय.
एखाद्या गुन्हेगाराने गुन्ह्यातून मालमत्ता कमवली असेल अशा निकषापर्यंत जेव्हा तपास यंत्रणा येऊन पोहचतात तेव्हा त्या मालमत्ता जप्त करण्याचा अर्ज करतात. असाच अर्ज एसायटीने केला आहे. कराडची मालमत्ता राज्यात अनेक ठिकाणी पसरल्या आहेत असं सांगितलं जातं. या मालमत्ता गुन्ह्यातून कमवल्या असल्याचा अंदाज एसआयटीला आहे. त्यामुळं कराडची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज एसआयटीने विशेष न्यायालयाच दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराडच्या बीड जिल्ह्यात शेतजमिनी आहेत. तसंच, पुणे, संभाजी नगरमध्येदेखील कराडच्या मालमत्ता आहेत. कराडची जवळपास 80 ते 90 कोटींची मालमत्ता असल्याचा अंदाज एसआयटीला आहे. ती सगळी मालमत्ता आता जप्त होऊ शकते. एसआयटीच्या अर्जावर सोमवारी किंवा मंगळवारी सुनावणी होईल. त्यानंतर एसआयटीयावर निर्णय घेईल.
वाल्मिक कराडचे सगळे मेडीकल रिपोर्ट सार्वजनिक करा आणि त्याची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी ट्विटरवरून केलीय
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला 46 दिवस पूर्ण झालेत. मात्र तरीही आंधळे पोलिसांना सापडला नाहीये. त्याचा शोध पोलीस, सीआयडीची पथकं घेताहेत मात्र अजूनही तो तपास यंत्रणेना गुंगारा देतोय. बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलं असून कृष्णा आंधळेची माहिती देणा-यांना पोलिसांनी बक्षीस जाहीर केलंय. तसेच माहिती देणा-यांची नावही गोपनीय ठेवण्यात येणार आहे. मात्र तरीही आंधळेंचा पत्ता लागलेला नाहीये.