माधुरी दीक्षितच्या कोट्यावधींच्या कारवर खिळल्या सगळ्यांच्या नजरा; नवऱ्यासोबत उदयपुरमध्ये रोमॅन्टिक ड्राईव्हवर अभिनेत्री

Madhuri Dixit : माधुरी दीक्षितचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Jan 25, 2025, 11:21 AM IST
माधुरी दीक्षितच्या कोट्यावधींच्या कारवर खिळल्या सगळ्यांच्या नजरा; नवऱ्यासोबत उदयपुरमध्ये रोमॅन्टिक ड्राईव्हवर अभिनेत्री title=
(Photo Credit : Social Media)

Madhuri Dixit : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या नवरा डॉ. श्रीराम नेनेसोबत उदयपुरमध्ये सुट्टीचा आनंद घेते. यावेळी माधुरीनं मॅकलेरन कारच्या सेलिब्रेशनच्या ड्राइव्हमध्ये सहभाग घेतला. दरम्यान, यावेळी माधुरीनं मॅकलेरन 750 चालवत या रॅलीमध्ये भाग घेतला. उदयपुरमध्ये माउंट आबूपर्यंत असलेल्या या ड्राइव्हमध्ये भारतात 50 मॅकलेरन सुपरकारची विक्री आणि फॉर्मुला वन टीमच्या कंस्ट्रक्टर्स चॅम्पियनशिपचं सेलिब्रेशन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माधुरीचे या कार्यक्रमातील अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

सिटी पॅलेसच्या माणक चौकावर झालेल्या या कार्यक्रमाच्या आधी माधुरीनं पिछोला तलावाच्या किनाऱ्यावर खूप वेळ फिरताना दिसते. माधुरीनं सांगितलं की 'मला खूप छान वाटतंय, इथे इतकी सुंदर सकाळ आहे आणि तापमान देखील चांगलं आहे. इथे खूप थंड आहे आणि मी खरं सांगायचं तर मी खूप जास्त आनंदी आहे. त्याशिवाय ही ड्राइव्ह आज होणार आहे. हे मी पहिल्यांदा करणार आहे आणि मला वाटतं की हे रोमांचक असणार आहे. उदयपुरच्या रस्ते, गल्ल्या आणि महाल खूप सुंदर आहेत. मी इथे त्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेते.' 

माधुरी दीक्षितनं मॅकलेरन 750 चालवली. या गाडीची किंमत 5.91 कोटी रुपये आहे. तर ऑन-रोड या गाडीची किंमत 6.79 कोटी आहे. ही राईड उदयपुरच्या माणक चौकापासून सुरु होऊन माउंट आबू असा संपूर्ण प्रवास करुन उदयपुरमध्ये परतनार आहे. रॅलीमध्ये 11 मॅकलेरन गाड्या असणार आहेत. तर या गाड्या माउंच आबूपर्यंत जाण्याआधी काही सगळ्यात ऐतिहासीक ठिकाणी जाणार आहे. तर या 11 गाड्यांमध्ये 720, जीटी, आर्टुरा आणि अनेक वेगवेगळ्या 750S स्पायडर व्हर्जन आहे. 

हेही वाचा : Mahakumbh 2025 : ममता कुलकर्णी होणार किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर, संगममध्ये करणार पिंडदान

दरम्यान, माधुरी दीक्षित ही सगळ्यात शेवटी कार्तिक आर्यन आणि तब्बूसोबत 'भूल भुलैया 3' मध्ये दिसली होती. माधुरीनं आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिचे चित्रपट आणि अभिनय हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. त्याच्याशिवाय उत्तम डान्स करणारी माधुरी ही तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक व्हिडीओ देखील शेअर करताना दिसते.