इंद्र कुमारच्या खाजगी आयुष्याबाबत पत्नीने केले हे '३' धक्कादायक खुलासे !

हृद्यविकाराच्या झटक्याने अवघ्या 43 व्या वर्षी अभिनेता इंद्र कुमारने अकाली एक्झिट घेतली. इंद्रच्या निधनानंतर त्याची पत्नी सोनलने इंद्रच्या खाजगी आयुष्याबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Aug 3, 2017, 04:17 PM IST
इंद्र कुमारच्या खाजगी आयुष्याबाबत पत्नीने केले हे '३' धक्कादायक खुलासे !  title=

मुंबई : हृद्यविकाराच्या झटक्याने अवघ्या 43 व्या वर्षी अभिनेता इंद्र कुमारने अकाली एक्झिट घेतली. इंद्रच्या निधनानंतर त्याची पत्नी सोनलने इंद्रच्या खाजगी आयुष्याबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

 

इंद्र कुमार ईशा कोप्पिकरच्या प्रेमात !

 

"इंद्र माझ्याशी लग्न करेपर्यंतही ईशा कोप्पिकरच्या प्रेमात होता. पण मी त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. अनेकदा लग्नानंतरही इंद्र मला सांगून ईशाला भेटायला जायचा. ईशाला घरी घेऊन ये असे मी अनेकदा इंद्रला सांगितले होते पण तो कधीच अभिनेत्रींना घेऊन घरी येत नसे." असे सोनलने  सांगितले आहे. तसेच आमच्या घटस्फोटानंतरही तो ईशाच्या संपर्कात होता असेही सोनल सांगितले.

 

इंद्र त्याच्याच विश्वात मग्न असायचा !  

 

ईशाच्या प्रेमात आणि नशेमध्येच  इंद्र रममाण असायचा. इंद्रच्या दारू आणि नशेत राहण्याच्या सवयीपासून त्याला परावृत्त करण्याचे खूप प्रयत्न केले पण इंद्र त्याच्याच विश्वात रममाण असायचा.

 

मुलीच्या जन्माचा आनंद नाही

 

"मी गरोदर असतानाच आम्ही घटस्फ़ोटाचा निर्णय घेतला होता. आणि मुलीच्या जन्मानंतरही इंद्रला त्याचा फारसा आनंद झाला नव्हता. माझ्या मेसेजलाही त्याने प्रतिसाद दिला नव्हता.  " असे सोनलने सांगितले आहे.

 

इंद्रने 1996 साली 'मासूम' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर इंद्र कुमारे गोविंदा सोबत 'कुवांरा', सलमान खानसोबत 'वॉन्टेड' आणि 'तुमको न भूल पाएंगे' या चित्रपटांमध्ये केलेले काम विशेष गाजले.सलमान प्रमाणेच इंद्रने अक्षय कुमार सोबतही काम केले होते.  2017 साली प्रदर्शित झालेली  ‘हु इज द फर्स्ट वाइफ ऑफ माई फादर’ हा इंद्रचा शेवटच्या काळातला विशेष लक्षवेधी चित्रपट राहिल.

‘फटी पड़ी है यार’  या आगामी चित्रपटासाठी इंद्र शुटींग करत होता. पण अंधेरी येथील त्याच्या राहत्या घरीच रात्री 2 वाजता हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.