Khatron Ke Khiladi Actress Oops Moment: छोट्या छोट्या गोष्टींनी आपली कशी फजिती होईल हे काही आपल्याला सांगता येत नाही. तुम्ही अनेकदा अभिनेत्रींना पाहिलं असेलच. एवढ्या मोठ्या आणि उंच टाचांच्या चपला घातल्यामुळे त्याला अनेकदा ट्रोलही केले जाते. अनेकदा त्या या चपला घातल्यामुळे धडपडायच्या देखील. सध्या 'खतरों के खिलाडी' या रिएलिटी शोमधील एका अभिनेत्रींच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. 'खतरों के खिलाडी' इतक्या खतरनाक शोमध्ये सहभागी होत स्टंटबाजी करणारी ही अभिनेत्री एकाकी अशी रस्त्यावर धडपडली हे पाहून तर नेटकऱ्यांनी तिची जोरात खिल्ली उडवली आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे याची बरीच चर्चा आहे.
आपल्याला रस्त्यात कधी पुढे काय ठेवलं आहे हे पटकन लक्षातही येत नाही त्यामुळे आपण गोंधळून जातो. यावेळी ही अभिनेत्री आणि सेलिब्रेटी आहे सना मकबूल. तिच्या हटके स्टाईलनं आणि व्यक्तिमत्त्वानं सर्वांची मनं जिंकून घेतली होती. किंबहूना तिच्या धैर्याचेही अनेक जणं कौतुक करताना दिसत होते. परंतु अशाप्रकारे रस्त्यावर धडपडल्यामुळे तिची नेटकरी चांगलीच फजिती उडवत आहेत. यावेळी समोर आलेल्या व्हिडीओतून असे कळते की ती एका पार्टीत गेली होती. तेव्हा पार्टीतून बाहेर आल्यानंतर मात्र तिला उप्स मुमेंटचं शिकार व्हावं लागलं होतं. तेवढ्यात तिला एकानं सांभाळं. त्यामुळे ती थोडक्यात बचावली.
समोर आलेल्या व्हिडीओतून हे दिसून येते आहे की ती फार सुंदर दिसत होती. तिनं डेनिमचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. त्यामुळे तिची विशेष चर्चा ही रंगलेली होती. यावेळी तिनं हा फारच स्मार्ट लुक कॅरी केला होता. परंतु असा ड्रेस घालणं मात्र तिला फारच महागात पडलं त्यातून तिनं हाय हिल्सही घातल्या होत्या. त्यानंतर ती पापाराझींना पोझ देत होती परंतु मागे वळताच तिचा तोल गेला आणि मग ती जोरात पडली. परंतु त्यातूनही ती उभी राहिली आणि मग तिनं स्मितहास्य देत पापाराझींना परत पोझ दिली.
समांथा प्रमाणेच तिही ऑटोइम्यून हेपेटाईटिस या आजारानं त्रस्त होती. 2020 सालापासून तिला हा आजार होता. त्यानंतर ती बरीच डिप्रेसही होती. यावेळी तिला अनेक जणं या व्हिडीओवरून ट्रोलही करत होते परंतु ज्याप्रकारे ती परत उभी राहिली हे पाहून सगळेच तिचेही कौतुक करायला लागले.