Lata Mageshkar Love Story : भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं आज 6 फेब्रुवारी 2023 पहिला स्मृतीदिन...त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. दीदींच्या आवाज अजून साक्षात सरस्वती देवीचा अधिवास...त्यांनी अनेक भाषांमध्ये हजारो अविस्मरणीय गाणी गायली. आठ दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत त्यांनी 36 भाषांमध्ये 50,000 हून अधिक गाणी गायली आहेत. आजही त्यांचा अविस्मरणीय ठेवा रसिकांनी जपून ठेवला आहे. इतकंच काय तर त्यांनी लग्न का नाही केलं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर लता दीदी यांचे कोणावर प्रेम होते? इतकंच काय तर प्रेम होतं तर लग्न का नाही केलं. (Lata Mageshkar Death Anniversary)
लताजींचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला. लता दीदी यांच्या घरची परिस्थिती चांगली नसल्यानं त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. दीदींनी त्यांच्या मेहनत आणि जिद्दीनं स्थान मिळवले. लता दीदींना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आणि त्यानंतर 2001 साली त्यांना भारतातील सर्वात मोठा पुरस्कार भारतरत्न देत सन्मानित करण्यात आले होते. (Lata Mageshkar Love Life)
हेही वाचा : लता मंगेशकर यांना स्लो पॉयझन देऊन मारण्याचा प्रयत्न, तीन महिने अंथरुणाला खिळल्या
लता दीदींचे फक्त भारतात नाही तर परदेशातही चाहते होते. मग त्यांनी लग्न का केलं नाही? लता दीदी देखील कोणावर तरी प्रेम करायच्या मात्र, त्यांची ही लव्ह स्टोरी अर्धवट राहिली. रिपोर्ट्सनुसार, लता मंगेशकर या डुंगरपूर राजघराण्यातील महाराजा राज सिंह (Maharaja Raj Singh) यांच्यावर प्रेम करत होत्या. एका बातमीत तर असे म्हटले आहे की, राज सिंग यांनी त्यांच्या आई-वडिलांना वचन दिले होते की, ते कोणत्याही सामान्य कुटुंबातील मुलीशी लग्न करणार नाही आणि त्यामुळेच महाराजा राज सिंह शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या आई-वडिलांच्या जवळ राहिले आणि दिलेल्या वचनाचे पालन करत राहिले. महाराजा राज सिंह हे लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांचे चांगले मित्र होते, असे म्हटले जाते. (Why Did Not Lata Mangeshkar Got Married)
महाराजा राज सिंह यांना क्रिकेटची आवड होती. ते जवळपास 16 वर्षे फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले. यानंतर महाराजा राज सिंह 20 वर्षे भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) शी जोडलेले होते. दोन टर्म मध्ये नॅशनल टीमसाठी सिलेक्टर म्हणून काम केले होते आणि भारतीय संघाचे चार वेळा फॉरेन्ट मॅनेजमेंट केले. दरम्यान, विकीपिडियानं दिलेल्या वृत्तानुसार ते भारतीय जनता पार्टीचे सदस्य देखील होते. (Who Is Lata Mangeshkar's Love Of Life)
दरम्यान, एक माहिती अशी देखील आहे की लता दीदींचे म्हणने होते की त्यांच्यावर असलेल्या घरातील जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी लग्न केले नाही. लता दीदींवर अत्यंत लहान वयात घरातील मोठ्या जबाबदाऱ्या आल्या होत्या. त्यामुळेच त्यांनी लग्न केलं नाही.