Maharashtra Assembly Election Zeenia Exit Poll: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले आहे. आता सगळ्यांचेच लक्ष लागले आहे ते निकालाकडे. वेगवेगळ्या एक्झिट पोलच्या माध्यमातून मतदारांचा कल जाणून घेण्यात आला. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काँटे की टक्कर पहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात देशभर गाजलेले दोन मुद्दे चांगलेच चर्चेत आले. देशभरात गाजलेले हे दोन मुद्दे महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणार का? या ममुद्द्यांचा मतदारांवर परिणाम किती परिणाम झाला? जाणून घेऊया.
महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, व्होट जिहाद आणि बटेंगे तो कटेंगे या चार मुद्द्यांवर निवडणूक झाली. या पैकी व्होट जिहाद आणि बटेंगे तो कटेंगे हे दोन मुद्दे चांगलेच गाजले या दोन मुद्द्यांपैकी बटेंगे तो कटेंगे हा मुद्दा सर्वाधिक वादग्रस्त ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या पहिल्या प्रचारसभेपासून एक है तो सेफ है चा नारा दिलाय. योगी आदित्यनाथ यांनी राज्यात झालेल्या एका सभेत बटेंगे त कटेंगेचा नारा दिला होता.. मात्र त्यांच्या या नाऱ्याला भाजपमधूनच विरोध पहायला मिळाला. यामुळे या मुद्द्यावरुन भाजपवर जोरदार टीका झाली.
लोकसभा निवडणुकीतील निकालाचा दाखला देत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत व्होट जिहादचा मुद्दा जोर देऊन मांडला. फडणवीसांनी मौलाना सज्जाद नोमानी यांचा व्हिडीओ दाखवत महाविकास आघाडीवर व्होट जिहादचा आऱोप केला. आता फडणवीसांच्या आरोपांना खुद्द शरद पवारांनी उत्तर दिलंय. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी बटेंगे तो कटेंगेचा विचार मांडणं देशासाठी घातक असल्याची टीका शरद पवार यांनी केली.
महागाईच्या मुद्द्यावर 30 % मतदान झाले. बेरोजगारीच्या मुद्द्यावर 25%, भ्रष्टाचार च्या मुद्द्यावर 20% , व्होट जिहादच्या मुद्द्यावर 15% तर, बटेंगे तो कटेंगे या मुद्दयावर 10% मतदान झाले.
'बटेंगे तो कटेंगे'चा मतदांरांवर 40% सकारात्मक परिणाम झाला तर, 50 टक्के नकारात्मक प्रभाव पडला. तर, 10 % मतदारांनी तटस्थ भूमिका घेतली.
'एक है तो सेफ है' या मुद्द्याचा 70% सकारात्मक परिणाम झाला. तर 20% नकारात्मक झाला तर 10% मतदार तटस्थ राहिले.