'देवा'मधील ज्या इंटिमेट सीनला लागली कात्री, 'तो' शाहिद कपूर - पूजा हेगडेचा लिपलॉक VIDEO VIRAL

Deva : शाहिद कपूरच्या 'देवा' या चित्रपटाला UA प्रमाणपत्र मिळाले आहे, मात्र त्यापूर्वी या चित्रपटातील शाहिदसोबत पूजा हेगडेचा लिपलॉक सीन कट करण्यात आला. तो सीन आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jan 31, 2025, 05:38 PM IST
'देवा'मधील ज्या इंटिमेट सीनला लागली कात्री, 'तो' शाहिद कपूर - पूजा हेगडेचा लिपलॉक VIDEO VIRAL  title=

Deva : शाहिद कपूरचा मोस्ट अवेटेड 'देवा' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. शाहिद कपूर आणि पूजा हेगडे यांचा इंटिमेट सीनला सेन्सॉर बोर्डाने ज्या कात्री लावली. मात्र हा सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील पूजा हेगडे आणि शाहिदच्या इंटिमेट सीनवर आक्षेप घेत ते हटवण्यास सांगितलंय. निर्मात्यांना चित्रपटातून 6 सेकंदाचा इंटिमेट सीन काढला असला तरी हा सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कोणता सीन कापला होता?

या चित्रपटात शाहिद आणि पूजा हेगडेचा सहा सेकंदाचा लिप-लॉक सीन होता. ज्यावर सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली. पण हा सीन लिक झाला अन् एवढंच नाही तो आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा सीन काढून टाकल्यानंतरच देवा चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने  U/A प्रमाणपत्र दिलंय.

देवामधील तो कट झालेला सीन आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधेय शाहिद आणि पूजा सुमारे 23 सेकंद लिप लॉक करताना दिसत आहेत. 

देवा चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर या शाहिद कपूरला न्याय आणि बंडखोरी यांच्यातील पातळ रेषेवर चालणारा निडर पोलीस म्हणून दाखवला. तर पूजा हेगडे पत्रकाराची भूमिका निभवतेय. तेरी बातों में ऐसा उल्झा जिया या चित्रपटातील शेवटच्या भूमिकेनंतर ॲक्शन-थ्रिलर शाहीद जवळजवळ वर्षभरानंतर मोठ्या पडद्यावर पुन्हा झळकलाय. 

17 जानेवारीला 'देवा'चा ट्रेलर रिलीज झाला होता, ज्यामध्ये शाहिद कपूर पुन्हा एकदा फुल ॲक्शनमध्ये दिसला होता. चित्रपटाचा ट्रेलर 2 मिनिटे 18 सेकंदांचा आहे, जो खूप आवडला होता. ट्रेलरमध्ये शाहिदच्या ॲक्शनसोबतच बॅकग्राउंडमध्ये एक संवादही आहे, जो खूप आवडला. तो डायलॉग असा आहे की, 'तो आमच्या कार्यक्रमात घुसला आणि माझ्या भावावर गोळी झाडून त्याला ठार मारले. आता आमची पाळी आहे, आता आम्ही प्रवेश करू. प्रत्येक गल्लीत, त्या व्यवस्थेत, प्रत्येक गल्लीत ज्याला आपण मोकळे सोडले आहे.'

शाहिद कपूर सध्या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत असून त्याचे जोरदार प्रमोशन करत आहे. नुकतेच प्रमोशन दरम्यान त्याने सांगितले की, एक वेळ अशी होती जेव्हा त्याच्याकडे कपडे घेण्यासाठी पैसे नव्हते.