69 व्या वर्षी बिल गेट्स प्रेमात धुंद, गर्लफ्रेण्ड 2 मुलांची आई; भेटीची कहाणी खूपच रोमॅंटीक!

Bill Gates LoveStory: बिल गेट्स यांनी त्यांची नवीन मैत्रीण पॉला हर्डसोबतच्या नात्याला दुजोरा दिला आहे.

Pravin Dabholkar | Updated: Feb 6, 2025, 08:48 PM IST
69 व्या वर्षी बिल गेट्स प्रेमात धुंद, गर्लफ्रेण्ड 2 मुलांची आई; भेटीची कहाणी खूपच रोमॅंटीक! title=
बिल गेट्स

Bill Gates LoveStory: मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे जगभरातील श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत येतात. त्यांच्या यश, अपयशाच्या कहाण्या सांगितल्या जातात. ज्यातून नवीन पिढी प्रेरणा घेत असते. पण आता बिल गेट्स यांची प्रेम कहाणी समोर आली आहे. त्यांनी आपल्या गर्लफ्रेण्डची ओळख करुन दिली आहे. हे सांगताना बिल गेट्स यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. 69 वर्ष वय असलेल्या बिल गेट्स यांची गर्लफ्रेण्ड आहे तरी कोण? ती काय करते? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

बिल गेट्स यांनी त्यांची नवीन मैत्रीण पॉला हर्डसोबतच्या नात्याला दुजोरा दिला आहे. 'मी भाग्यवान आहे की मला एक सिरियस मैत्रीण मिळाली, असे त्यांनी एका टीव्ही मुलाखतीत सांगितले. पॉला असे बिल गेट्स यांच्या मैत्रिणिचे नाव आहे. आम्ही एकत्र खूप एन्जॉय करतोय.ऑलिंपिकला जात आहोत आणि खूप छान छान गोष्टी करत असल्याचे बिल गेट्स आपल्या मुलाखतीत म्हणाले. 

कशी सुरु झाली प्रेम कहाणी?

बिल गेट्स यांची प्रेमकहाणी कशी सुरु झाली असेल? याबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे. 2023 पासून बिल गेट्स पॉला हर्डच्या प्रेमात पडल्याच्या चर्चा सुरू आहेत. दोघेही अनेक ठिकाणी एकत्र दिसले आहेत. 2021 मध्ये बिल गेट्सचा मेलिंडा गेट्सशी घटस्फोट झाला. यानंतर फक्त दोन वर्षांतच बिल गेट्स पॉलासोबत रिलेशनशिपमध्ये आले.पॉला हर्ड ही ओरेकलचे दिवंगत सीईओ मार्क हर्ड यांच्या पत्नी आहे. मार्क हर्ड यांचे 2019 मध्ये कर्करोगाने निधन झाले. पॉलाला मार्कपासून कॅशरीन आणि कॅली या दोन मुली आहेत. पॉलाच्या पतीने तिच्यासाठी सुमारे $500 दशलक्ष किमतीची संपत्ती मागे सोडली आहे. पॉलाने टेक्सास विद्यापीठातून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली आहे. पॉला हर्ड यांनी नॅशनल कॅश रजिस्टर नावाच्या कंपनीत काम केले आहे. पॉलाने शैक्षणिक आणि धर्मादाय संस्थांनाही मोठ्या प्रमाणात देणगी दिली आहे.

टेनिस सामन्यादरम्यान झाली भेट

बिल गेट्स आणि पॉला यांची भेट 2015 मध्ये एका टेनिस सामन्यादरम्यान झाली. दोघांनाही टेनिस खेळाची आवड आहे. दोघांचे अनेक कॉमन मित्रदेखील आहेत. या कारणामुळे ते पुन्हा पुन्हा भेटत राहिले. पॉलाच्या पतीच्या मृत्यूनंतर आणि बिल गेट्सपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्यांची मैत्री प्रेमात बदलली. आता बिल गेट्स यांनीही हे नाते जाहीरपणे स्वीकारले आहे.

गेट्सना त्यांचे लग्न मोडल्याबद्दल पश्चात्ताप 

'मला मेलिंडासोबतचे लग्न तोडल्याबद्दल पश्चात्ताप होतोय. माझा घटस्फोटाचा अनुभव चांगला नव्हता. आम्हाला तीन मुले आहेत आणि आम्ही एकत्र केलेले काम अमूल्य आहे,' असे म्हणत बिल गेट्स यांनी घटस्फोटाबद्दल पश्चाताप व्यक्त केला होता. लंडनच्या द टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 'जर मला माहित असते की हे नाते कायमचे टिकणार नाही तर मी ते पुन्हा केले असते. मी घटस्फोटानंतर पुढे गेलो आहे. मेलिंडा चांगली आहे. मला खूप काम करायचे आहे जे मला आवडत. म्हणून मी कशाबद्दलही तक्रार करत नसल्याचे' ते म्हणाले. 

एका महिला सहकाऱ्याशीही जोडले गेले होते नाव

बिल गेट्स यांचे नाव त्यांच्याच कंपनीच्या एका महिला सहकाऱ्याशीही जोडले गेले होते. दोघांमध्ये अफेअर असल्याच्या बातम्या येत होत्या. 2019 मध्ये मायक्रोसॉफ्टच्या एका महिला इंजिनीअरने एक पत्र लिहून बिल गेट्ससोबतचे तिचे नाते उघड केले. 'मला बिल गेट्सच्या अफेअरबद्दल माहिती होती,' असे बिल गेट्स यांच्या पत्नी मेलिंडा यांनीही एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते.