Zomatoने बदललं नाव, आता 'या' नव्या नावाने ओळखली जाणार कंपनी!

Zomato Name Change: भारतीय फूड डिलीव्हर कंपनी झोमॅटोने आपलं नाव बदललं आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 6, 2025, 06:13 PM IST
Zomatoने बदललं नाव, आता 'या' नव्या नावाने ओळखली जाणार कंपनी! title=
झोमॅटो

Zomato Name Change: भारतीय फूड डिलीव्हर कंपनी झोमॅटोने आपलं नाव बदललं आहे. झोमॅटो ही ऑनलाइन फूड ऑर्डर आणि डिलिव्हरीची सुविधा देते. झोमॅटो अॅपद्वारे तुम्ही तुमच्या आवडीचे अन्नपदार्थ काही मिनिटांत तुमच्या घरी पोहोचवू मागवू शकता.

झोमॅटो आता इटरनल नावाने ओळखली जाणार आहे. झोमॅटोने त्यांच्या ईमेल आणि वर्कस्पेसला एटरनल असे नाव दिले होते. तथापि, झोमॅटो अॅपचे नाव बदलून इटरनल ठेवण्यात येण्याची चर्चा गेले अनेक वर्षे सुरु होती.झोमॅटोने त्यांचे मुख्य व्यवसाय चालवण्यासाठी चार सीईओंची नियुक्ती केली होती. या सीईओंना एकाच मूळ कंपनीच्या अंतर्गत आणणे आणि त्यांचे संचालन करणे हा यामागचा उद्देश होता. या मूळ कंपनीचे नाव इटरनल होते.

झोमॅटोची स्थापना पंकज चड्ढा आणि दीपिंदर गोयल यांनी 2008 मध्ये केली होती.झोमॅटो ही एक ऑनलाइन रेस्टॉरंट डिस्कव्हरी आणि फूड ऑर्डरिंग कंपनी आहे. झोमॅटोकडे ब्लिंकिट, हायपरप्युअर आणि फीडिंग इंडिया सारखे ब्रँड देखील आहेत.

गुरुवारी एका नियामक फाइलिंगनुसार झोमॅटोच्या संचालक मंडळाने कंपनीचे नाव 'झोमॅटो लिमिटेड' वरून 'इटरनल लिमिटेड' असे बदलण्यास मान्यता दिली आहे. कंपनीच्या संचालकांनी मान्यता दिलेल्या ठरावानुसार कंपनीचे नाव 'झोमॅटो लिमिटेड' वरून 'इटर्नल लिमिटेड' असे बदलण्यास मान्यता देण्यात आली आहे. कंपनीने जाहीर केलेल्या निवेदनात याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

झोमॅटो अॅपचे नाव बदलले जाणार नाही पण स्टॉक टिकर झोमॅटो वरून इटर्नल असे बदलले जाईल. इटर्नलमध्ये (सध्या) चार प्रमुख व्यवसाय असतील. ज्यामध्ये झोमॅटो, ब्लिंकिट, डिस्ट्रिक्ट आणि हायपरप्युअर यांचा समावेश आहे.

'इटरनल' असे नाव बदलण्याचा निर्णय का घेतला?

जेव्हा आम्ही ब्लिंकिट विकत घेतले तेव्हा आम्ही कंपनी आणि ब्रँड/अॅपमध्ये फरक करण्यासाठी अंतर्गतरित्या 'इटरनल' (झोमॅटोऐवजी) वापरण्यास सुरुवात केली, अशी माहिती झोमॅटोचे ग्रुप सीईओ आणि सह-संस्थापक दीपिंदर गोयल यांनी बीएसईला दाखल केलेल्या निवेदनात दिली. ज्या दिवशी आमच्या भविष्याचा महत्त्वाचा चालक झोमॅटोच्या पलीकडे काहीतरी बनलेला असेल त्या दिवशी आम्ही कंपनीचे सार्वजनिकरित्या नाव बदलून इटर्नल असे करू असे आम्ही म्हटले होते. आज ब्लिंकिटसह आम्ही तिथे आहोत असे आम्हाला वाटते. आम्ही झोमॅटो लिमिटेडचे ​​नाव इटरनल लिमिटेड असे बदलू इच्छितो, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.