गरिबीतून सुपरस्टार होण्यापर्यंतचा संघर्ष आणि बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रशी लग्न, फोटोमधील अभिनेता कोण?

हा अभिनेता आज बॉलिवूडचा सुपरस्टार असला तरी त्याचा प्रवास खूप कठीण होता. एक वेळ अशी होती जेव्हा तो झोपडपट्टीत राहत होता आणि त्याला त्याच्या पहिल्या नोकरीसाठी केवळ 1500 रुपये मिळाले होते. 

Intern | Updated: Feb 6, 2025, 05:32 PM IST
गरिबीतून सुपरस्टार होण्यापर्यंतचा संघर्ष आणि बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रशी लग्न, फोटोमधील अभिनेता कोण? title=

Guess This Actor: बॉलिवूडमध्ये नायकाची प्रतिमा नेहमीच देखणा, गोरा आणि फिट असलेल्या व्यक्तीची असते. पण या अभिनेत्याने त्याच्या कठोर परिश्रमाने आणि चिकाटीने हे सर्व बदलले. चाळीत जन्मलेला आणि गरिबीत वाढलेला हा अभिनेता नेहमीच आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत राहिला. त्याच्या मेहनतीने आणि नशीबाने त्याला सुपरस्टार बनवले. आज हा अभिनेता बॉक्स ऑफिसवर हिट चित्रपट देत नाही, तर त्याच्या अभिनयाची आणि लूकची क्रेझ देखील आहे. हा अभिनेता आहे विकी कौशल. विकी कौशलचे आज अनेक चाहते आहेत, त्याच्या लूकमुळे नेहमीचं चाहते त्याचे कौतुक करत असतात. 

विकी कौशलने आपल्या कारकिर्दीला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली होती. वयाच्या 24व्या वर्षी तो चित्रपट सेटवर काम करत होता, जिथे त्याने अभिनय आणि निर्मितीचे बारकाईने निरीक्षण केले. त्याचा संघर्ष आणि मेहनत त्याला एक स्टार बनवणारा ठरला. त्याच्या प्रवासाची सुरुवात एकेकाळी 1500 रुपयांच्या कमाईने झाली होती, पण त्याने आपले स्वप्न कधीही सोडले नाही आणि आज तो बॉलिवूडमधील एक महत्वाचा अभिनेता आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

विकीने इंजिनिअरिंग पूर्ण केली, परंतु अभिनयाची आवड त्याने त्याच्या जीवनाच्या मुख्य प्रवाहात घेतली. त्याचा संघर्ष 2011 मध्ये सुरू झाला. 2011 मध्ये त्यांनी 'तृष्णा' या लघुपटात काम केले आणि 'गँग्स ऑफ वासेपूर' मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. 2012 मध्ये त्यांनी 'लव्ह शव ते चिकन खुराना', 'गीक आउट' आणि 'बॉम्बे वेल्वेट' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आणि 2015 मध्ये 'मसान' सारख्या चित्रपटात त्याने अभिनयाची क्षमता सिद्ध केली. या चित्रपटात विकी कौशल प्रसिद्धी मिळू लागली. यानंतर, त्याच्या 'राजी', 'संजू', 'लस्ट स्टोरीज' आणि 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' यांसारख्या चित्रपटांमुळे विकी कौशलला बॉक्स ऑफिसवर यश मिळालं आणि तो सुपरहिट हिरो बनला.

हे ही वाचा: राम कपूरने वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेच्या अफवांना दिले उत्तर, व्हिडीओ शेअर करत उघड केलं सत्य

आता विकी कौशल केवळ फिल्म इंडस्ट्रीतील एक स्टार नाही, तर त्याचा एक खास व्यक्तिमत्त्वही आहे. त्याच्या अभिनयामुळे आणि शरीरयष्टीमुळे त्याला लाखो लोकांची मने जिंकली आहेत. याचदरम्यान, बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री कतरिना कैफही विकी कौशलच्या प्रेमात पडली आणि दोघांनी 2021 मध्ये थाटामाटात शाही विवाह केले. 

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या जोडीनं बॉलिवूडमधील एक उत्कृष्ट आणि लोकप्रिय जोडी बनवली आहे. विकी कौशल आज 26 हून अधिक प्रोजेक्ट्समध्ये काम करतो आणि  14 फेब्रुवारी रोजी त्याचा 'छावा' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील त्याचे काम पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.