Exclusive: घरगुती हिंसाचार ते वैवाहिक अधिकार, धनंजय मुंडेंचे वकील शार्दुल सिंहनी दिली महत्वाची माहिती

Advocate Shardul Singh Exclusive Interview:  धनंजय मुंडे यांचे वकील शार्दुल सिंह यांनी झी 24 तासला विशेष मुलाखत दिली आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 6, 2025, 05:31 PM IST
Exclusive: घरगुती हिंसाचार ते वैवाहिक अधिकार, धनंजय मुंडेंचे वकील शार्दुल सिंहनी दिली महत्वाची माहिती  title=
वकील शार्दुल सिंह

Advocate Shardul Singh Exclusive Interview: करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांनी महिन्याला दोन लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहे. यांसदर्भात धनंजय मुंडे यांचे वकील शार्दुल सिंह यांनी झी 24 तासला विशेष मुलाखत दिली आहे. 

करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांची केस 2022 पासून वांद्रे कौटुंबिक न्यायालयात सुरु आहे.वांद्रे कोर्टात 5 ते 25 लाख मिळावे अशी याचिका दाखल केली होती.कायद्यात कोणतीही महिला पैसे मागू शकते.कोर्टाने ऑर्डर राखीव ठेवला होता. 4 फेब्रुवारीला अंतरीम ऑर्डर पारीत केले. मुंडे साहेबांनी आपले संबंध लपवले नव्हते, लीव्ह इन रिलेशनशिप मान्य केली होती, असे शार्दुल सिंह म्हणाले. 

यात फिजिकल अब्युज वगैरे काहीही नाही आहे. यात सव्वा लाख आणि 75 हजार रुपये मिळावे असं कोर्टाने मान्य केलंय. कोर्टाची ऑर्डर माझ्याकडे आहे. मारहाण वगैरे संदर्भात कोणताही निर्णय नाही आहे . पोटगी नाही आहे ही मेन्टेनन्स हा शब्द वापरावा, असे शार्दुल सिंह म्हणाले. 

लग्न वगैरे नाही झालं होतं. करुणा मुंडे म्हणतायत मला बायको म्हणून स्विकारावं. 25 कोटी रुपये द्यावे, 5 ते 25 लाख द्यावं अशा अनेक मागण्या असल्याचे ते म्हणाले. माझ्याकडे पैसे नाहीत असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्या अप्लिकेशनवर कोर्टाने मान्य करत मेन्टेनन्स दिला जो सव्वा लाख रुपये आणि 75 हजार रुपये अशी असल्याचे ते म्हणाले. 

धनंजय मुंडेंनी कौटुंबिक हिंसाचार केलाय असं कोर्टाने कुठेच म्हटलं नाहीय. हिंसाचार हा शारीरिक आणि मानसिक असू शकतो. त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. माझा भावनिक छळ झालाय, असा करुणा मुंडे यांचा युक्तीवाद आहे. मी त्यांची पहिली पत्नी असल्याचेही त्यांनी म्हटलंय. आम्ही पुराव्यावर ठरवू असं कोर्टाने म्हटलंय. कोर्टाने वादी-प्रतिवादींचे म्हणणे रेकॉर्ड केलंय,असे शार्दुल सिंह यावेळी म्हणाले. 

धनंजय मुंडे यांनी करुणा यांच्यासोबतचे संबंध मान्य केले होते.घरगुती हिंसाचाराची पेटीशन अंतर्गत याचिका दाखल केल्यावर त्याचा प्रकार कोर्टात त्यायला हवा. यात वैवाहिक हक्क मला द्यावा असं करुणा शर्मांचं म्हणणं आहे. लग्न झालं की नाही हे पुराव्यावर ठरवेल, असं कोर्टाने म्हटलंय.