'आई वडिलांचा बदला घेतीये', मुलगा सिशिव मुंडेच्या आरोपांवर करुणा शर्मांनी सोडलं मौन, 'मी काय वाईट...'

Karuna Sharma on Seeshiv Munde Post: करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले असताना मुलगा सिशिव शिंदे याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने वडिलांची बाजू घेतली असून, आईविरोधातच आरोप केले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Feb 6, 2025, 07:46 PM IST
'आई वडिलांचा बदला घेतीये', मुलगा सिशिव मुंडेच्या आरोपांवर करुणा शर्मांनी सोडलं मौन, 'मी काय वाईट...' title=

Karuna Sharma on Seeshiv Munde Post: वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या असून, सगळ्या आरोपांचा पुनरुच्चार केला आहे. पण यादरम्यान त्यांचा मुलगा सिशिव मुंडे याने एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. वडील धनंडय मुंडेंची बाजू घेताना त्याने आईवरच आरोप केले आहेत. कायम तिच्या अनेक विविध कारणांमुळे बाधित असायची आणि त्याचा वचपा ती आम्हाला वेदना देऊन काढायची असा आरोप त्याने केला आहे. यावर करुणा शर्मांनी प्रतिक्रिया दिली असून, त्याच्यावर दबाव असल्याचा दावा केला आहे. 

'मी ठेवलेली बाई नाही, तर धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे'; करुणा शर्मांना अश्रू अनावर, 'माझा नवरा...'

मुलाच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे की, "तो किती तणावात होता, त्यांच्या डोक्यावर किती प्रेशर होता. माझ्यावरही मीडियासमोर बाोलू नका यासाठी दबाव टाकला जात होता. मी काही वाईट बोलतही नव्हती. मी न्यायालयाचे आणि माझ्या वकिलांचे फक्त आभार मानत होते. त्यांना सतत आपल्या वडिलांचे फोन येत होते. त्यातूनच दबाव निर्माण झाला आणि ही पोस्ट केली". 

सिशिव मुंडेच्या पोस्टमध्ये काय?

करुणा शर्मा व धनंजय मुंडे यांचा 18 वर्षांचा मुलगा शिशीव धनंजय मुंडे याने पोस्ट पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने म्हटलं आहे की, "मी सीशिव धनंजय मुंडे, मला आता बोलणं भाग आहे कारण माध्यमांनी आमच्या कुटुंबाला मनोरंजनाचा विषय बनवून टाकलं आहे. माझा बाप जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसला तरी तो आम्हा भावंडांसाठी कधीही हानिकारक नव्हता.  माझी आई कायम तिच्या अनेक विविध कारणांमुळे बाधित असायची आणि त्याचा वचपा ती आम्हाला वेदना देऊन काढायची". 

'कलेक्टर ऑफिसमध्ये धनंजय मुंडेंसमोर मला मारहाण,' करुणा शर्मांचा गौप्यस्फोट, म्हणाल्या 'वाल्मिक कराडने...'

'माझा बाप जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसला तरी...', धनंजय मुंडे आणि करुणा शर्मांच्या मुलाची पोस्ट, 'आईनेच खरं तर...'

 

पुढे त्याने म्हटलं आहे की, "जो घरगुती हिंसाचार तिच्यासोबत झाला असा ती दावा करते तो खरं तर मी, माझी बहीण व माझे वडील यांच्यासोबत तिच्याकडून व्हायचा.  माझ्या वडिलांना तिच्याकडून होणारा शारीरिक व मानसिक जाच असह्य झाल्यानंतर ते तिला सोडून गेल्यावर तिने मला व माझ्या बहिणीलासुद्धा घर सोडून जायला सांगितलं. कारण तिच्या मते तिचा व आमचा ( जन्मदाती आई असुनही) काहीही संबंध राहिला नव्हता".   


"2020 या वर्षापासून आमचे वडीलच आमची सर्वस्वी काळजी घेत आहेत. माझ्या आईला कोणत्याही आर्थिक विवंचना नाहीत. तरीसुद्धा तिने घराचे कर्जाचे हप्ते भरायचे नाही असे जाणीवपूर्वक ठरवले आणि माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कायम खोट्यानाट्या गोष्टी पसरवत असते," असंही त्याने सांगितलं आहे. 

2 लाखांचा देखभाल खर्च देण्याचा आदेश

कोर्टाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मांना जो 2 लाखांचा देखभाल खर्च देण्यास सांगितलं आहे त्यातील 1 लाख 25 हजार उदरनिर्वाहासाठी आहेत. तर 75 हजार मुलीचं लग्न होईपर्यंत तिच्या देखभालीसाठी आहेत. मुलगा सज्ञान असल्याने त्याला कोणतेही पैसे मिळणार नाहीत.