Udit Narayan Kisses Again: 'ती' सेल्फी घेण्यासाठी आली अन्... उदित नारायण यांचा आणखी एक Video Viral

उदित नारायण यांनी एका महिला चाहत्याला किस केल्याचा वाद अजून संपत नाही तोपर्यंतच त्यांचा असाच आणखी एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. 

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 6, 2025, 08:18 PM IST
Udit Narayan Kisses Again: 'ती' सेल्फी घेण्यासाठी आली अन्... उदित नारायण यांचा आणखी एक Video Viral title=

Udit Narayan Video : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण सध्या त्यांच्या कोणत्याही गाण्यामुळे नाही तर एका लाईव्ह शोमध्ये त्यांच्या महिला चाहत्यांना किस केल्यामुळे चर्चेत आहेत. या शो दरम्यान त्यांनी एका महिला चाहत्याच्या ओठांवर किस घेतानाचा  त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली होती. हा विषय संपत नाही तोपर्यंत त्यांचा असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामुळे उदित नारायण हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 

काही दिवसांपूर्वीच 69 वर्षीय गायक उदित नारायण हे एका कार्यक्रमात टिप टिप बरसा पानी गाण्याचे सादरीकरण करताना दिसले. यावेळी तिथे असणाऱ्या महिलेला त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. त्या महिलेने त्यांच्या गालावर किस घेतले तेव्हा उदित नारायण यांनी तिच्या ओठांवर किस घेतले. याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच वाद निर्माण झाला. अशातच आता आणखी एक उदित नारायण यांची क्लिप समोर आली आहे, ज्यामध्ये गायिका सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असताना उदित नारायण हे एका महिला चाहत्याच्या ओठांवर किस घेताना दिसले.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय? 

सध्या उदित नारायण यांचा हा व्हिडीओ एक्स अकाऊंटवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये उदित नारायण हे स्टेजवर दिसत आहेत. तर अनेक चाहते त्यांच्याभोवती सेल्फी घेण्यासाठी जमले आहेत. त्यावेळी एक महिला सेल्फीची विनंती करते तेव्हा उदित नारायण हे खाली वाकून त्या महिला चाहत्याच्या ओठांवर किस घेताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म  एक्सवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पासून लोक खूप संतापले आहेत.

जरी यापूर्वी उदित नारायण हे शो दरम्यान एका महिला चाहत्याला किस करताना दिसले असले तरी तेव्हा गायकाने या घटनेचे स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, 'मी बॉलिवूडमध्ये 46 वर्षांपासून आहे. माझी प्रतिमा अशी नाही की मी कोणालाही जबरदस्तीने किस करतो. मी हात जोडतो, जेव्हा मी स्टेजवर माझ्या चाहत्यांकडून माझ्यावर होणारे प्रेम पाहतो तेव्हा मी नतमस्तक होतो आणि विचार करतो की हा क्षण परत येईल किंवा येणार नाही.