बजेटच्या आदल्यादिवशीच सोने-चांदीच्या दरात मोठी हालचाल; आताच माहिती करुन घ्या!

Budget 2025:  सोने, चांदीचे दर हादेखील सर्वसामान्यांच्या जवळचा विषय आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 31, 2025, 05:51 PM IST
बजेटच्या आदल्यादिवशीच सोने-चांदीच्या दरात मोठी हालचाल; आताच माहिती करुन घ्या! title=
सोने-चांदी दर

Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प जाहीर करतील. यामध्ये सर्वसामान्यांशी निगडीत कोणत्या गोष्टी महागणार? कोणत्या गोष्टी स्वस्त होणार? याबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता आहे. सोने, चांदीचे दर हादेखील सर्वसामान्यांच्या जवळचा विषय आहे. शुभ मुहुर्त, विशेष दिवशी सोने, चांदी खरेदी करुन ठेवण्याची आपल्याकडे प्रथा आहे. दरम्यान बजेटच्या आदल्यादिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ पाहायला मिळतेय. 

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याने आतापर्यंतची विक्रमी उच्चांकी गाठली आहे.जळगावच्या आतापर्यंत गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच सोन्याच्या दाराने मोठी उच्चांकी गाठली 84 हजाराचा आकडा पार केला आहे. जळगावात जीएसटीसह सोन्याचे दर 84 हजार 600 रुपयांवर पोहोचले असून चांदी 96 हजार रुपयांवर पोहोचली.

महिनाभरात सोन्याचे दर 4 हजार रुपयांनी वाढलेयत तर चांदी सुद्धा 5 हजार रुपयांनी वधारली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपूर्वी तसेच या वर्षाच्या सुरुवातीला सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या सुवर्णनगरीतील ग्राहकांना चांगला परतावा मिळत असल्याच पाहायला मिळत आहे.सोन्याचे दर 90 हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून चांदीचे दर 1 लाख रुपयांवर पोहोचण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

जळगावच्या सराफ बाजारामध्ये गेल्या महिनाभरामध्ये मोठी उलाढाल झाली असून सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सद्यस्थितीत सोन्याच्या दाराने तर जळगावच्या सुवर्णनगरीतील आतापर्यंतची सर्वात मोठी म्हणजेच विक्रमी उंचाकी गाठले आहे. जळगावात जीएसटीसह सोन्याचे दर 84 हजार 600 रुपयांवर पोहोचले असून चांदी 96 हजार रुपयांवर पोहोचली.

त्यामुळे गेल्या काही वर्षांपूर्वी तसेच या वर्षाच्या सुरुवातीला जाग ग्राहकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली त्यांना चांगला परतावा मिळत असल्याचा पाहायला मिळत आहे. अशीही माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली आहे.दरम्यान जागतिक बाजारातील सुरू असलेल्या घडामोडी. त्यामुळे सोन्याचे दर 90 हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून चांदीचे दर 1 लाख रुपयांवर पोहोचण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. 

मिस्ड कॉलवरून किंमत जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर कसे माहिती करुन घ्यायचे? असा प्रश्न नेहमी विचारला जातो. तुम्हालादेखील हा प्रश्न पडला असेल तर 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करू शकता. मिस्ड कॉलच्या काही वेळात एसएमएसद्वारे तुम्हाला सोन्याचे दर पाहता येतील. यासोबतच सोने बाजारातील सतत अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.