मुंबई : फेमिना मिस वर्ल्ड हा किताब जिंकणारी मानुषी ही छिल्लर ही भारतातील सहावी महिला ठरली.
तब्बल १७ वर्षांनी मिस वर्ल्ड हा किताब मानुषीने भारतासाठी पटकावला आहे. मानुषीची चर्चा सगळीकडेच अगदी जोरदार रंगत आहे. अगदी तिच्या खाजगी आयुष्याबरोबरच तिच्या करिअरची देखील चर्चा होत आहे.
मानुषी बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार का? हा प्रश्न साऱ्यांनाच पडला. त्याचप्रमाणे तिचा आतापर्यंतचा प्रवास हा देखील वेगळा असल्याचं म्हटलं जातं. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी जगभरात तिच्या नावाची चर्चा होणं ही काही सामान्य बाब नाही. मानुषीचा एक सामान्य विद्यार्थिनी ते फेमिना मिस वर्ल्ड २०१७ पर्यंतचा प्रवास साधा नसून प्रेरणादायी आहे. मानुषी तिच्या २० व्या वर्षातील ग्लॅमरस लूकमुळे आता चर्चेत असली तरीही तिचा आधीचा लूक हा कसा होता? हे पाहणं साऱ्यांसाठीच उत्सुकतेचं आहे. सोशल मीडियावर मानुषीचा दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे.
मनुश्री एमबीबीएस करीत असतानाचा हा व्हिडिओ असून या व्हिडिओमध्ये ती सांगत आहे की, मी एमबीबीएस प्रथम वर्षीची विद्यार्थिनी आहे. मनुश्री व्हिडिओमध्ये म्हणते, मी येथे माझी जागा सुरक्षित केली आहे. मी बारा तास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी नाही. मी फक्त १२वीमध्ये असतानाच एआयपीएमटीची तयारी सुरु केली. मग मी रवी सर भौतिकशास्त्राचे कोचिंग घेतले. कारण येथे प्रवेशा केवळ भौतिकशास्त्रांमध्ये ही समस्या आहे. भौतिक विज्ञानामध्ये प्रत्येक गोष्ट संकल्पना आधारित आहे.
मनुश्री पुढे म्हणते की, मी माझ्या सरांचे आभार मानू इच्छिते कारण मी त्या सर्व संकल्पना पूर्ण केल्या. आपण कितीही अभ्यास केला तरी आपल्याला कमीच मार्क मिळणार आहेत. परंतु प्रवेशाच्या वेळी, संकल्पना स्पष्टपणे असायला हवी. कारण त्या वेळी प्रश्न समजत नाही. एवढा अभ्यास केल्यानंतरही मी शाळांतील इतर कार्यक्रमांतही भाग घेतला. आपल्याला कठोर परिश्रम करण्याची गरज नाही, स्मार्ट काम करण्याची गरज आहे.