Mother's Day 2019: जान्हवीची 'मॉम' श्रीदेवीसाठी भावनिक पोस्ट

आज 'मातृदिनी' जान्हवीने तिच्या आईसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे

Updated: May 12, 2019, 02:02 PM IST
Mother's Day 2019: जान्हवीची 'मॉम' श्रीदेवीसाठी भावनिक पोस्ट title=

मुंबई : बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन होऊन एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. परंतु आजही श्रीदेवी यांच्या आठवणी ताज्या आहेत. श्रीदेवी यांच्या अचानक जाण्याने सिनेसृष्टीसह सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. श्रीदेवी यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर श्रीदेवींसोबतचे फोटो शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा देत असते. आज 'मातृदिनी' जान्हवीने तिच्या आईसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला तिने भावनिक कॅप्शनही लिहिलं आहे. 

जान्हवीने तिचा लहानपणीचा श्रीदेवी यांच्यासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवरुन पोस्ट केला आहे. 'त्यांच्या आठवणी हृदयात जतन करा..त्यांचं ऐका..त्यांच्यावर प्रेम करा' असं कॅप्शन देत जान्हवीने आईबद्दलचं तिचं प्रेम व्यक्त केलं आहे. 

 
 
 
 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

जान्हवी लवकरच गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटातून ती प्रमुख भूमिका साकारणार आहे. त्यासोबत ती करण जौहरच्या 'तख्त' आणि राजकुमार रावसह हॉरर कॉमेडी 'रुह-अफजा'मधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.