Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: महाराष्ट्रातील निवडणुकीचे कल समोर येऊ लागले आहेत. अनेक दिग्गजांची प्रतिमा आज पणाला लागली आहे. दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे उमेदवार रोहित पवार यांच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात यंदा काय होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजेच एनसीपीकडून लढताना रोहित पवार यांनी 1 लाख 35 हजार 824 मतांनी विजय मिळवला. तर त्यांच्या विरोधात असलेल्या भारतीय जनता पार्टी (भाजपा)चे प्रा. राम शंकर शिंदे यांचा 43 हजार 347 मतांच्या फरकाने पराभव झाला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत फूट पडली. त्यामुळे त्यांना मतविभाजनाचा धोका आहे. अशावेळी कर्जत-जामखेडमध्ये रंगतदार लढत होणार हे नक्की झालंय.
कर्जत जामखेड विधानसभा मतदासंघात आमदार रोहित पवार विजयी झाले आहेत. त्यांनी आमदार राम शिंदे यांचा पराभव केला. असे असले तरी दोघांमध्ये अटीतटीची लढत झाली. शेवटच्या फेरीत रोहित पवार यांनी 1 हजार 243 मतांनी विजय मिळवला आहे. यात रोहित पवार यांना 1 लाख 27 हजार 676 तर आमदार राम शिंदे यांना 1 लाख 26 हजार 433 मते मिळाली.
20 व्या फेरीअखेर रोहित पवार हे 285 मतांनी आघाडीवर आहेत. रोहित पवार यांना 20 व्या फेरी अखेर 98 हजार 464 मते आहेत. आणखी 6 फेऱ्यांचे निकाल येणे बाकी आहे.
10.45 वा. चौथ्या फेरीअखेर राम शिंदे हे 2143 मतांनी आघाडीवर आहेत.
10.10 कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार पिछाडीवर
9.40 वाजता कल हातील आले तेव्हा रोहित पवार पिछाडीवर होते.
8.45 वाजता पहिल्या निकालाचे कौल हाती आले तेव्हा रोहित पवार आघाडीवर होते.
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ हा अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा भाग असून तो महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात येतो. 2009 च्या निवडणूकीत भाजपचे प्रा. राम शंकर शिंदे 43 हजार 845 मतांनी विजयी झाले होते. त्यांनी देशमुख केशवराव (INC) यांचा पराभव केला होता. यानंतर 2014 ची निवडणूक भाजपचे राम शंकर शिंदे विरुद्ध शिवसेनेच्या रमेश खाडे अशी झाली होती. ज्यात राम शिंदे 84 हजार 58 मतांनी विजयी झाले.2019 च्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार रोहित पवार 1 लाख 35 हजार 824 मतांनी विजयी झाले. त्यांच्याविरोधात भाजपचे प्रा. राम शंकर शिंदे लढत होते.
रोहित पवार यांनी 2014 मध्ये पुणे जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि त्यांचा विक्रमी मतांनी विजयही झाला होता. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून ते निवडणूक लढवत होते. येथे आधी 25 वर्षे भाजपची सत्ता होती. त्यामुळे या रोहित पवारांच्या विजयाला महत्व आले होते. भाजपच्याच बालेकिल्ल्यात राम शिंदे यांचा 40 हजार मतांनी पराभव झाला होता.
कर्जत जामखेड मतदारसंघात रोजगाराचा मुद्दा फार चर्चेत आहे. येथे रोजगाराच्या फार संधी उपलब्ध नसल्याने मतदारसंघात तरुण मोठ्या संघाने स्थलांतरीत होऊ लागले आहेत. येथे औद्याोगिकीकरणाची गरज आहे. त्यामुळे एमआयडीसी हा मुद्दा निवडणुकीत प्रभावी ठरु शकतो.
कर्जत जामखेड मतदारसंघात जातीय समीकरणाचा प्रभावही दिसून येऊ शकतो. येथे मराठा, माळी, धनगर समाजांचे मतदार मोठ्या संख्येत आहे. त्याखालोखाल मुस्लीम आणि मागासवर्गीयांचे मतदान आहे. ही मते ज्याच्या बाजुने वळतील तो उमेदवार जिंकण्याची जास्त शक्यता आहे.