मुंबई : संगीतकार अशोक पत्की यांनी समीर आठल्ये दिग्दर्शित आगामी 'बकाल' या भव्यदिव्य ॲक्शनपटासाठी एक अनोखा संगीतप्रयोग केला आहे. वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी त्यांनी हा प्रयोग केला आहे. दिग्दर्शक समीर चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी पत्की यांच्यावर सोपवली. अवीट गोडीची, सुमधूर चालीची गाणी देणारे अशोक पत्की यांचा पाश्चिमात्य शैलीतील हा संगीत प्रयोग पाहून संगीतविश्वात त्यांचे खूप कौतुक होत आहे.
चित्रपटाचा बाज हा तरुणाईशी निगडीत असल्याने आधुनिक पद्धतीचे पाश्चिमात्य शैलीचे संगीत निर्माण करावे लागेल, असल्याचे समीर यांनी स्पष्ट केले आहे. या अनोख्या प्रयोगोसाठी पत्की यांनी नकार दिला होता. पण समीर यांच्या अग्रहामुळे त्यांनी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केलं.
'मी कधी नव्हे ते पहिल्यांदा स्वत:ची चौकट मोडून एक आयटम साँग रचले आहे. ह्या अश्या बाजाची गाणी मी कधीच रचली नव्हती. त्यामुळे ही गाणी करताना भलतेच टेन्शन आले होते. कारण अंतिमत: ती कशी होतील, याची पूर्ण कल्पना नव्हती.' असा खुलासा खुद्द पत्की यांनी केला आहे.
राजकुमार मेन्डा निर्मित शिव ओम व्हिज्युअल्स प्रा. लि. प्रस्तुत मराठीतील पहिला भव्यदिव्य ॲक्शनपट ‘बकाल’ येत्या ८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.