मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारे संबंध तणावाच्या वळणावर पोहोचल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. जम्मू- काश्मीरमध्ये लागू असणारं अनुच्छेग ३७० रद्द केल्यांनंतर कला, क्रीडा अशा सर्वत क्षेत्रांतून याविषयीच्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. त्यातच आता एका पकिस्तानी अभिनेत्रीच्या वक्तव्याने अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
देशभक्ती आणि अतोनात देशप्रेमाच्या ओघात भारतीय कलाविश्व आणि बॉलिवूडला शांततेच्या मार्गाचा विसर पडला आहे, असं वक्तव्य पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयात हिने केलं आहे. शिवाय पाकिस्तानी कलाकार आणि पाकिस्तान या देशाविषयीसुद्धा ते नकारात्मकत पसरवत असल्याचं ती म्हणाली. हॉलिवूडकडूप्रतिही तिने हीच तक्रार व्यक्त केली.
पाकिस्तानच्या माध्यमांध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार हल्लीच मेहविशला नॉर्वेच्या पंतप्रधानांच्या हस्ते ओस्लो येथे 'प्राईड ऑफ परफॉर्मन्स' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. याचवेळी तिने आपलं मनोगत व्यक्त करताना केलेल्या भाषणाचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.
'आमच्या शेजारी (भारतात) राष्ट्रात विश्वातील सर्वात मोठं चित्रपट विश्व आहे. मुख्य म्हणजे ज्यावेळी ते आपल्या ताकदीचा वापर हा देश जोडण्यासाठी करतील तेव्हा ते काय करत आहेत?', असा प्रश्न तिने उपस्थित केला. त्यांनी साकारलेल्या असंख्य चित्रपटांमध्ये पाकिस्तानला खलनायकी रुपात दाखवलं आहे, असंही ती म्हणाली.
I was honoured to address distinguished guests in Oslo & talk abt film & peace.Also spoke abt how films frm Hollywood & our neighbours hv vilified Pakistan to a point that even I don't recognise the country that they show.Y is nobdy showing the sacrifices we hv made war on terror pic.twitter.com/hA6V1Q5m0q
— Mehwish Hayat TI (@MehwishHayat) August 11, 2019
भारतीय चित्रपटांमधील राष्ट्रवादाविषयीसुद्धा तिने लक्षवेधी वक्तव्य केलं. राष्ट्रवादी भूमिका अधिक महत्त्वाची आहे की, शांततापूर्ण भविष्य हे आता त्यांनी (भारतीय कलाविश्वाने) ठरवलं पाहिजे असा विचार तिने व्यक्त केला. दहशतवाद आणि बंदुकधारी असण्यापलीकडेही पाकिस्तानची वेगळी ओळख आहे, आम्हीही पुढे जात प्रगती केली पाहिजे, असा आशावाद मांडत तिने किमान गोष्टींमध्ये समतोल राखला जाणं महत्त्वाचं आहे, ही बाब सर्वांसमक्ष ठेवली.