Raghav Chadha Nose Surgery : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री परिणीति चोप्रा आणि 'आम आदमी पार्टी' खासदार राघव चढ्ढा यांचा 13 मे रोजी साखरपुडा झाला. त्यांचा हा साखरपुडा दिल्लीत झाला. त्यानंतर एक सेलिब्रेशन देखील करण्यात आलं. यावेळी या कार्यक्रमा दरम्यान, एका महिलेनं राघव यांना थेट त्याच्या चेहऱ्यावर काही बदल झाल्याचे विचारले. त्यावेळी बोलताना राघव यांनी सर्जरी केल्याचा खुलासा केला. त्यानंतर परिणीति त्याला इशारा करत असल्याचे त्यात दिसते. राघव यांनी केलेलेल्या या वक्तव्यानंतर सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली आहे.
परिणीति आणि राघव यांच्या साखरपुड्याचे शूट ज्या फोटोग्राफरनं केले. त्या फोटोग्राफरनं त्याच्या वेबसाईटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. पण काही वेळात त्या फोटोग्राफरनं हा व्हिडीओ डिलीट केला. या व्हिडीओत राघव चड्ढा हे परिणीतिच्या कुटुंबातील काही सदस्यांशी बोलत होते. त्यावेळी राघव यांना परिणीतिच्या कुटुंबातील एका महिलेनं म्हटलं की मुलानं चेहऱ्यावर काही केलं आहे. यावर उत्तर देत राघव म्हणाले की हो, मी नाकाची सर्जरी केली आहे. कारण माझं नाव हे आईवर होतं आणि मला ते वडिलांसारखं हवं होतं. राघव पुढे बोलणार तेवढ्यात परिणीती त्यांना थांबवत बोलते की चारही बाजुंना कॅमेरा आहे आणि हे कॅमेरे सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करत आहेत.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळीकडे राघव चड्ढा यांच्या नाकाच्या सर्जरीची चर्चा सुरु झाली आहे. अनेकांना त्यानं धक्का बसला आहे. अनेकांनी तर प्रश्न विचारला आहे की हे नक्की खरं आहे की खोटं. कारण राघव यांचा हा व्हिडीओ त्या फोटोग्राफरनं शेअर केला आहे. त्यानंतर त्यानं हा व्हिडीओ त्याच्या साईटवरून काढून टाकला होता.
हेही वाचा : 21 वर्षांनी मोठ्या नेत्याशी केलं 'या' लोकप्रिय अभिनेत्रीनं लग्न!
परिणीति आणि राघव हे गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनी इंग्लंडमध्ये शिक्षण केलं होतं. परिणीति आणि राघव या दोघांना आउटस्टॅन्डिंग अचीवर्स हा पुरस्कार देखील मिळाला आहे. या कार्यक्रमात ब्रिटिश यूनिव्हर्सिटीतून शिक्षण केलेल्या लोकांना सन्मानित केलं होतं. परिणीति आणि राघव या दोघांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात अनेक कलाकार आणि नेत्यांनी हजेरी लावली होती. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांच्या साखरपुड्यासाठी परिणीतिची बहीण प्रियांका चोप्रा देखील लंडनहून दिल्लीत आली होती. पण यावेळी तिच्यासोबत मालती किंवा पती निक जोनस नव्हते तर ती एकटीच आली होती.