मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा 'रेड' हा सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे.
मागील वर्षी 'बादशाहो','गोलमाल अगेन' या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. त्यानंतर यंदा अजय देवगण 'रेड' हा चित्रपट घेऊन आला आहे.
तरण आदर्श यांनी 'रेड'चं कौतुक केलं आहे. या चित्रपटाचा रिव्ह्यू एका शब्दामध्ये दिला आहे. हा शब्द म्हणजे 'शानदार'.
#OneWordReview...#Raid: SUPERB.
Rating:-
This nail-biting thriller is smart, engaging, gripping and entertaining... Go for it!— taran adarsh (@taran_adarsh) March 15, 2018
मीडिया रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार अजय देवगणचा 'रेड' चित्रपट बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ट्रेड अॅनालिस्टच्या अंदाजानुसार, चित्रपट पहिल्याच दिवशी 10 कोटींचा गल्ला जमवू शकते. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृषण कुमार, कुमार मंगत आणि अभिषेक पाठक यांनी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केलं आहे.
अजय देवगण या चित्रपटामध्ये इनकम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये इमानदार ऑफिसरच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. अजयच्या जोडीला इलियाना डिक्रुज दिसणार आहे. इलियाना यामध्ये अजयच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. चित्रपटाची कहाणी सत्यकथेवर आधारित आहे. अजयच्या भूमिकेचं नाव शरद प्रसाद पांडे आहे.
शरदने सरदार इंद्र सिंह यांच्या घरावर 1981 साली छापा टाकला होता. त्यावेळेस 1 कोटी 60 लाख रूपयांची कॅश आणि सोनं जप्त केलं होतं. या छाप्या अंतर्गत 18 तास तपास झाला. सउमारे 45 लोकं केवळ सलग नोटा मोजत होते.
'रेड' चित्रपटाला संगीत अमित त्रिवेदीनं दिलं आहे. काही गाण्यांना पुन्हा नव्याने रिक्रिएट करण्यात आले आहे.