पहिल्या पत्नींचा छळ करणारा तो कसा बनला Rakhi Sawant चा पती? धक्कादायक गोष्ट समोर

पण 'बिग बॉस 15' च्या शोमध्ये तिने पती रितेशसोबत शोमध्ये प्रवेश केला होता. 

Updated: Jan 26, 2022, 01:17 PM IST
पहिल्या पत्नींचा छळ करणारा तो कसा बनला Rakhi Sawant चा पती? धक्कादायक गोष्ट समोर title=

मुंबई : मनोरंजनाचं फुल ऑन पॅकेज असणाऱ्या राखी सावंतने अचानक लग्न केल्याने तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. बऱ्याच दिवसांपासून राखीच्या पतीचा पत्ता नव्हता, अनेकांना राखी खोटं बोलत आहे असं वाटू लागलं होतं, पण 'बिग बॉस 15'मध्ये रितेशच्या एन्ट्रीने राखीचे सत्य जगासमोर आलं.

गेल्या अनेक वर्षांपासून राखी नेहमीच आपण विवाहित असल्याचा दावा करत आहे. मात्र, 'बिग बॉस 15'पूर्वी तिने पतीला मीडियाच्या नजरेपासून दूर ठेवले होते. पण 'बिग बॉस 15' च्या शोमध्ये तिने पती रितेशसोबत शोमध्ये प्रवेश केला होता. पण नुकताच राखीने खुलासा केल्याने तिच्या चाहत्यांसाठी ही हा धक्का असणार आहे.

विवाह कायदेशीररित्या नाही

शोमधील रेडिओ जॉकीसोबतच्या संभाषणात राखीने तिच्या लग्नाबाबत अनेक मोठे खुलासे केले, त्यापैकी एक म्हणजे तिचे लग्न कायद्याच्या दृष्टीने कायदेशीर नाही. होय, जेव्हा RJ ने राखी सावंतला विचारले की तू रितेशसोबत कायदेशीर विवाहित केला आहेस का? तेव्हा राखी सावंतकडे काहीच उत्तर नव्हते.

राखीने घातली एक अट 

राखी सावंत म्हणाली की, तिने रितेशसोबत लग्नाची नोंदणी केलेली नाही. त्यांनी देवाला साक्षीदार मानून एका खोलीत लग्न केले होते, मात्र राखी सावंत अजूनही कायद्याच्या नजरेत अविवाहित आहे.

मात्र, रेडिओ जॉकीसोबतच्या संभाषणात राखीने नॅशनल टीव्हीवर रितेशसमोर एक अट घातली आहे की, त्याला आता लग्नाची नोंदणी करावी लागेल आणि नोंदणीचे प्रमाणपत्र राखीला दाखवावे लागेल. कारण आता ती अशी जगू शकत नाही. तिला ते प्रमाणपत्र हवे आहे नाहीतर रितेशला ते विसरावे लागेल. त्याला दया नको आहे, जर त्याला वाटत असेल की तो तिच्या प्रेमास पात्र आहे तर ते प्रमाणपत्र दाखवावे लागले.

बिग बॉसमध्ये राहत असताना राखी सावंतचा पती रितेशचा एक फोटो समोर आला होता, ज्यामध्ये तो एक महिला आणि मुलासोबत दिसत होता. ती रितेशची पहिली पत्नी असून ती मीडियात दिसली असल्याचा दावा केला जात होता.

स्निग्धा प्रिया असे तिचे नाव आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिने रितेशची पत्नी असल्याचा दावा केला आहे. रितेश विवाहित असून तो स्वत:ला राखी सावंतचा नवरा कसा सांगत आहे याचे स्निग्धाला ही आश्चर्य वाटत आहे. स्निग्धाने असेही सांगितले की तिने रितेशवर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.