रणबीरचा Animal सिनेमा पहायला जाताय? शेवट चुकवू नका; निर्मात्यांनी दिलंय खास सरप्राईज!

Sequel Of Animal Announced : 'अ‍ॅनिमल' ची एक दिवसाच्या कमाईनं अमेरिकेत सलमान खानच्या 'टायगर 3' चा रेकॉर्ड मोडला आहे. सलमानच्या चित्रपटानं एका दिवसात 1.70 लाख रुपयांची कमाई केली होती.

सौरभ तळेकर | Updated: Dec 1, 2023, 06:20 PM IST
रणबीरचा Animal सिनेमा पहायला जाताय? शेवट चुकवू नका; निर्मात्यांनी दिलंय खास सरप्राईज! title=
Sequel Of Animal film

Animal Film Sequel : सुपरस्टार अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) आणि अभिनेत्री रश्मिका मानधना (rashmika mandanna) यांचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. लोकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ असून पहिल्याच दिवशी शोमध्ये मोठी गर्दी होत आहे. रणबीरच्या या गँगस्टर लूकमध्ये पाहण्यासाठी पब्लिक खूप उत्सुक होते. पहिल्या दिवशी मिळणाऱ्या क्रेझी प्रतिसादामुळे आता रणबीरच्या हा सिनेमा (animal film) बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशातच आता पहिल्या चित्रपटासोबतच निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलचीही (Animal Film Sequel) घोषणा केलीये. 

अॅनिमल'च्या सोशल मीडिया टीमने सिनेमा रिलीज होण्याच्या आधीच्या रात्री चाहत्यांना विनंती केली होती की, चित्रपटाचा पोस्ट क्रेडिट सीन चुकवू नका. त्यामुळे पोस्ट क्रेडिट सीनमध्ये नेमकं काय होणार? अशी सर्वांना उत्सुकता लागली होती. अशातच, पोस्ट क्रेडिट सीनमध्ये चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. 'अॅनिमल'च्या सिक्वेलला 'अ‍ॅनिमल पार्क' असं नाव देण्यात आलं आहे, त्यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केलाय.

अ‍ॅनिमल सिनेमा तुम्हाला वेगळी अनुभूती देऊ शकतो. सिनेमाच्या पहिल्या फ्रेमपासून शेवटापर्यंत रणबीर कपूरच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा तुम्हाला पाहायला मिळतील. दमदार अभिनय, जबरदस्त अ‍ॅक्शन आणि म्युझिकमुळे हा सिनेमा इतर सिनेमांपेक्षा वेगळा ठरला आहे. त्याचबरोबर सिनेमाला देण्यात आलेला मराठी तडका प्रत्येकाने अनुभवला पाहिजे.

 Animal Review: संदीप रेड्डीचं दिग्दर्शन त्यावर रणबीरचा लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर! पण... जाण्यापूर्वी हेही वाचा

दरम्यान,  'अ‍ॅनिमल' ची एक दिवसाच्या कमाईनं अमेरिकेत सलमान खानच्या 'टायगर 3' चा रेकॉर्ड मोडला आहे. सलमानच्या चित्रपटानं एका दिवसात 1.70 लाख रुपयांची कमाई केली होती. तर 'अ‍ॅनिमल' नं एकाच दिवसात तब्बल 5.40 कोटींची कमाई केली आहे. भारतात हा चित्रपट पहिल्याच दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरणार आहे.