मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सुष्मिता ही फक्त एक अभिनेत्री नाही तर ‘मिस इंडिया’ (Sushmita Sen Miss India), ‘मिस युनिव्हर्स’ (Sushmita Sen Miss Universe) देखील आहे. आज सुष्मिताचा 47 वा वाढदिवस आहे. (Sushmita Sen's 47th Birthday)19 नोव्हेंबर 1975 रोजी जन्म झाला होता. सुष्मितानं 1996 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुष्मिता ही फक्त तिच्या प्रोफेश्नल लाइफमुळे नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. सुष्मिताच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या मोठ्या मुलीनं तिला सोशल मीडियावर फोटो शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहेत.
सुष्मितानं खूप लहान वयातच दोन्ही मुलींना दत्तक घेतलं होतं. तिच्या मोठ्या मुलीचं नाव रेने असं आहे तर छोट्या मुलीचे नाव हे अलिसा आहे. आई सुष्मिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत रेनेनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रेनेनं सुष्मितासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यावेळी 'वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लाईफलाईन.. आता तू तुझ्या आयुष्यातील सर्वात आनंददायी टप्प्यामध्ये प्रवेश करत असताना मला फक्त तुला धन्यवाद म्हणायचे आहे. तू खूप मोठ्या मनाची आहेस. यामुळेच तू लोकांना माफ करु शकतेस. तुझी मुलगी होणं हा देवाने दिलेला सर्वात मोठा आशीर्वाद आहे. तुझं काम अतुलनीय आहे. मी स्वत:ला खूप भाग्यशाली समजते की त्याची साक्षीदार असते,' असे रेने म्हणाली. (Sushmita Sen's Daughter Rene Shared A Post)
पुढे रेने म्हणाली, 'कृतज्ञता, धैर्य आणि दयाळूपणा मनात कसं ठेवायचं हे शिकवल्या बद्दल धन्यवाद... माझी योग्यता जाणून घेतल्याबद्दल आणि जेव्हा जेव्हा मला शंका वाटते तेव्हा मी किती सक्षम आहे याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. मला तुझ्यासोबत ऑडिशनची प्रॅक्टिस करायची आहे, तुझ्यासोबत संपूर्ण जगात प्रवास करायचा आहे, वर्कआउट करायचं आहे... तू जिथे असतेस तेच माझं घर आहे.'
हेही वाचा : T-Series च्या मालकाला Nora Fatehi करते डेट? सोशल मीडिया पोस्टमुळे एकच खळबळ
पुढे आई सुष्मिता विषयी बोलताना रेने म्हणाली, 'यशाच्या शिखरावर असतानाही पाय जमिनीवर कसे ठेवावेत हे शिकवल्याबद्दल धन्यवाद. तुझ्या आयुष्यामध्ये तू घेतलेले निर्णय योग्य का होते हे मला मी जसजशी वयाने मोठी होत आहे, तसे कळत आहे. शिस्त आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्यानं आणि हळू-हळू एक-एक पाऊल टाकणं किती महत्त्वाचं आहे हे दाखवून देण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला आणि अलिसाला स्वतःच्या अटींवर आयुष्य जगणं शिकवण्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप प्रेम आई. 47 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!' (Rene Sen Shared Special Post For Mother Sushmita Sen on her 47th Birthday)