Manu Bhaker: पॅरीस ऑलिम्पिक 2024मध्ये दुहेरी मेडलिस्ट असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी खेळाडू मनू भाकेरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या आजी आणि मोठ्या मामाचे रस्ते अपघातात निधन झाले आहे. महेंद्रगड बायपास रोडवर एका स्कूटर आणि ब्रेझा कारमध्ये भीषण टक्कर झाली. ही टक्कर इतकी भयानक होती की मनु भाकरचे आजोबा आणि मामा यांचा मृत्यू झाला.
या अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पळून गेला. मनू भाकर यांच्या आजीचे नाव सावित्री देवी आणि मामाचे नाव युद्धवीर होते. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
भारतीय स्टार नेमबाज मनू भाकरची 70 वर्षांची आजी सावित्री देवीदेखील राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकणारी खेळाडू होती. तर मोठा मामा युद्धवीर रोडवेज ड्रायव्हर होता. दोघांचाही रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेतपोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला. सध्या पोलीस पथके या अपघाताचा तपास करत आहेत.
समोर आलेल्या रिपोर्टनुसार, युद्धवीर यांचे घर महेंद्रगड बायपासवर आहे आणि ते स्कूटरवरून त्यांच्या ड्युटीवर जात होते. युद्धवीरने त्याच्या आईला आणि मनु भाकरच्या आजीला एकत्र बसवले. युद्धवीर सावित्री देवींना त्यांच्या धाकट्या भावाच्या घरी सोडणार होता. ते महिंदरगड रोडवरील कालियाना वळणावर पोहोचले तेव्हा कार चुकीच्या बाजूने येत होती. त्यानंतर दोघांचीही टक्कर झाली. गाडी खूप वेगाने जात होती आणि धडकेनंतर ती उलटली. यात मनू भाकेरची आजी आणि मामा मरण पावले.