'ना चेहरा, ना पर्सनॅलिटी...', जेव्हा प्रियांका चोप्राने अन्नू कपूर यांना किस करण्यास दिला नकार

Annu Kapoor on Priyanka Chopra: ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) विशाल भारद्वाज यांच्या 'सात खून माफ' (Saat Kboon Maaf) चित्रपटाचा भाग होती. या चित्रपटात तिच्यासह अन्नू कपूर (Annu Kapoor) यांनीदेखील महत्त्वाची भूमिका निभावली होती.   

शिवराज यादव | Updated: Feb 19, 2025, 09:49 PM IST
'ना चेहरा, ना पर्सनॅलिटी...', जेव्हा प्रियांका चोप्राने अन्नू कपूर यांना किस करण्यास दिला नकार title=

Annu Kapoor on Priyanka Chopra: ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) विशाल भारद्वाज यांच्या 'सात खून माफ' (Saat Kboon Maaf) चित्रपटाचा भाग होती. हा चित्रपट तिच्या करिअरमधील सर्वोत्तम चित्रपटांमध्ये गणला जातो. या चित्रपटात तिच्यासह जॉन अब्राहम, इरफान खान, विवान शाह, नसरुद्दीन शाह, अन्नू कपूर, निल नितीन मुकेस आणि उषा उथ्थपही मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात अन्नू कपूर (Annu Kapoor) आणि प्रियांका चोप्रा यांच्यात एक किस सीन शूट होणार होता. पण नंतर प्रियांका चोप्राने आक्षेप घेतल्याने हा सीन काढण्यात आला असा दावा अन्नू कपूर यांनी एका मुलाखतीत केला होता. 

अन्नू कपूर यांनी नुकतीच एएनआयच्या पॉडकास्टरला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी प्रियांका चोप्रासोबतच्या इंटिमेट सीनबद्दल सांगितलं होतं. या मुलाखतीत त्यांना इंटिमेट सीनवरुन प्रियांका चोप्रासह झालेलं मतांतर यासंबंधी विचारण्यात आलं होतं. तसंच तुम्हाला पटलं नाही तर अशा सीनला नकार देता का? असंही विचारण्यात आलं होतं. 

अन्नू कपूर यांनी उत्तर देताना सांगितलं होतं की, "सात खून माफ चित्रपटात अनेक इंटिमेट सीन होते. विशाल भारद्वाजने मला प्रियांका चोप्रा थोडी लाजत आहे असं सांगितलं. मी त्याला जर ती लाजत असेल तर सीन काढून टाका असं सांगितलं. उत्सव चित्रपटात तर मी रेखाची मालिश केली आहे. जेव्हा मी जुगार खेळून पळतो तेव्हा तर न्यूड सीनही दिले होते. आर के स्टुडिओत ते शूट झालं होतं". 

"मी विशालला सांगितलं की, जर तिला ठीक वाटत नसेल तर सीनच काढून टाक. त्यावर विशालने हे शक्य नाही म्हटलं. मी सोलो शॉट दिले. पण सोलो शॉट झाला तेव्हा तो पाहून एक असिस्टंट आला आणि म्हणाला सर तुम्हाला मानलं असं म्हणाला," अशी आठवणही त्यांनी सांगितली..

"प्रियांका चोप्राने मला किस करण्यास नकार दिल्याचं सांगण्यात आलं. मी म्हटलं ठीक आहे, पण त्यावरुन फार गदारोळ झाला होता. ती काय म्हणाली मला माहिती नव्हतं. पण मी म्हटलं, जर मी हिरो असतो तर प्रियांका चोप्राला काही आक्षेप नसता. हिरोला किस करण्यावर कोणत्याच अभिनेत्रीला आक्षेप नसतो. हिरो मी आहे, पण ना चेहरा, ना पर्सनॅलिटी. त्यामुळे समस्या आहे. हीच गोष्ट तिच्या मनाला लागली," असा खुलासा अन्नू कपूर यांनी केला होता.