Chhagan Bhujbal: 'जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना'... मंत्रिपदापासून दूर ठेवल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाराज होत हा डायलॉग मारला होता. मात्र भुजबळांची ही नाराजी दूर झाल्याची चर्चा सुरू झालीय. छगन भुजबळांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याने या चर्चा सुरू झालीय.
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर राष्ट्रवादीवर नाराज असलेल्या छगन भुजबळांनी असं शेरोशायरीच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता भुजबळांची राष्ट्रवादीवरील नाराजी दूर झाल्याची चर्चा सुरू झालीय. छगन भुजबळांनी अनेक दिवसानंतर पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वराज सप्ताह हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा शुभारंभ छगन भुजबळांच्या हस्ते झाला.
ज्या शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला उपस्थित राहिल्याचं छगन भुजबळ सांगताहेत. त्या अधिवेशनाला भुजबळ नावापुरतेच केवळ 2 तास उपस्थित होते. मात्र मुंबईतील पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने भुजबळांची नाराजी दूर झाल्याचं बोललं जातंय.
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर आरपारची भाषा करणारे भुजबळ आता मात्र पक्षाच्या नेत्यांसोबत उपस्थित राहुन गप्पागोष्टी करताना दिसताहेत. त्यामुळे जहाँ नहि चैना वहाँ नहि रहना वरून भुजबळांचा डायलॉग बदलून आता चैना यहाँ रहना यहाँ अशा झाल्याचं पाहायला मिळतंय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याची जोशी यांनी छगन भुजबळ यांना चक्क रामभक्ताची उपमा दिलीये. छगन भुजबळ म्हणजे ओबीसी नेते, छगन भुजबळ म्हणजे शाहू-फुले-आंबेडकरवादी नेते अशी छगन भुजबळ यांची प्रतिमा आहे. पण आता भय्यूजी जोशींनी त्यांना रामभक्त अशी नवी उपाधी बहाल केलीय. नाशिक जिल्ह्यातील नांदूर माध्यमेश्वरमधील राम मंदिराच्या जोर्णोद्धाराच्या कार्यक्रामत छगन भुजबळ आणि भय्याजी जोशी एकाच मंचावर आले होते. त्यावेळी जोशी यांनी हा उल्लेख केलाय. यावेळी छगन भुजबळ आणि भय्याजी जोशी यांनी श्रीरामाची एकत्रित आरतीही केली. या सोहळ्यासाठी जी बॅनरबाजीही केली त्या बॅनर्सच्या भगव्या रंगाचीही चर्चा होती.
आतापर्यंत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामार्फतच छगन भुजबळ यांच्याशी संपर्क साधला जात होता. अनेक वेळा छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर बोलण्यास टाळाटाळ केली होती. शिर्डीतल्या राज्यव्यापी शिबीरातही काही तासांसाठी हजेरी लावत छगन भुजबळ यांनी आपण नाराज असल्याचे पुन्हा संकेत दिले. पण आता चार दिवसांपूर्वी अजित पवार यांचा दिलगिरी व्यक्त करत फोन आल्याच छगन भुजबळ यांनी सांगितलं आणि अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या पॅचअपची चर्चा सुरु झाली. अजित पवार यांच्या या दिलगीरीच्या फोननंतर आता छगन भुजबळ यांची नाराजी दूर होते का, आणि छगन भुजबळ राष्ट्रवादीत सक्रीय होतात का याची उत्सुकता राष्ट्रवादीच्या राजकीय वर्तुळात असेल.