Rekha Gupta Delhi New CM : रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री होणार आहेत (Delhi CM Rekha Gupta). सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि आतिशी यांच्यानंतर रेखा दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहे. भाजप आमदार आणि पर्यवेक्षकांच्या बैठकीत रेखा गुप्तांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. दिल्लीतील रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत, दिल्ली भाजप अध्यक्ष, दिल्ली सरचिटणीस, संघटन मंत्री यांच्यासह एकूण 65 जण उपस्थित होते ज्यात 48 आमदार, दिल्लीचे 7 खासदार, 2 निरीक्षक, 3 प्रभारी आणि सह-प्रभारी यांचा समावेश होता. या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
11 फेब्रुवारी रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी 10 नवनिर्वाचित आमदारांची भेट घेतली. या आमदारांमध्ये विजेंद्र गुप्ता, रेखा गुप्ता, अरविंदर सिंग लवली, अजय महावार, सतीश उपाध्याय, शिखा राय, अनिल शर्मा आणि डॉ. अनिल गोयल, कपिल मिश्रा आणि कुलवंत राणा यांचा समावेश होता. दिल्ली विधानसभा निवडणुकीत 2015 पासून सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झालाय. तीन टर्म दिल्लीचे मुख्यमंत्री राहिलेल्या अरविंद केजरीवालांच्या आपचा पराभव झाला.
रेखा गुप्ता या दिल्लीच्या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. रेखा गुप्ता सध्या दिल्ली भाजपच्या सरचिटणीस आहेत. तसेच त्या भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा देखील आहेत. 195-96 मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवली आणि अध्यक्षा बनल्या. रेखा यांचा जन्म 1974 मध्ये हरियाणातील जिंद जिल्ह्यातील नंदगड गावात झाला. निवडणूक प्रतिज्ञापत्रा नमुद केल्यानुसार, रेखा गुप्ता यांच्याकडे 5.3 कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्यावर 1.2 कोटींचे लोन आहे. त्यांनी एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. रेखा गुप्ता यांच्याकडे 148000 रुपांची रोकड आहे. तर त्यांच्या बँक खात्यात 72.94 रुपये जमा आहेत. त्याचे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये शेअर्स देखील आहेत. याशिवाय, त्यांची एलआयसीमध्ये 53 लाख रुपयांची गुंतवणूक आहे.