Rare Fish: जपानच्या समुद्रकिनारी असा एक दुर्मिळ मासा दिसलाय ज्याला पाहून काहीतरी अघटित होणारेय, असे म्हटले जाते. ओअरफिश असे त्याचे नाव असून हा मासा कॅनरी बेटांमधील समुद्रकिनाऱ्यावरुन वाहून जाताना दिसला. यानंतर लोकांकडून भीती आणि चिंता व्यक्त केली जात आहे. यानंतर अंधश्रद्धांवर चर्चा सुरु झाली आहे. हा मासा 10 फेब्रुवारी रोजी समुद्रकिनाऱ्यावर दिसला होता. ज्याच्या व्हिडिओ सोशल मीडियात खूप व्हायरल होताय.
आपल्याला समुद्रात विविध प्रकारचे मासे दिसतात. जे आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. पण असेही काही मासे असतात, जे खोल समुद्रात असतात. जे क्वचितच समुद्र सपाटीवर येतात. त्यांनी समुद्र खोलीतून वर येणे हे मानवासाठी धोकादायक मानले जाते. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती समुद्रकिनाऱ्यावरील या माशाला पुन्हा पाण्यात टाकताना दिसत आहे. ओअरफिश हा खोल समुद्रातील मासा आहे आणि समुद्रकिनाऱ्याजवळ त्याचे दिसणे ही एक दुर्मिळ घटना आहे. हा मासा दिसणे म्हणजे काहीतरी वाईट घडत असल्याचे लक्षण असल्याचे काहींचे म्हणणे आहे.
जपानी आख्यायिकेनुसार या समुद्री सर्प माशाला रयुगु नो त्सुकाई किंवा 'समुद्राच्या देवाचा दूत' म्हणून ओळखले जाते. हा मासा वर येणे म्हणजे भूकंप आणि त्सुनामीसारख्या आपत्तींच्या भाकित असल्याचे जुने बुजुर्ग सांगतात. खोल समुद्रात राहिल्यामुळे या माशाचा अभ्यास करणे खूप कठीण असते.
म्हणूनच जेव्हा कॅनरी बेटांमधील प्लाया क्वेमाडाच्या किनाऱ्यावर हा मासा दिसला तेव्हा तो चर्चेचा विषय बनला. आतापर्यंत इंस्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला 99 लाख व्ह्यूज, 267 लाईक्स आणि 5 हजारांहून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. लोकांनी "काहीतरी चूक होईल" अशी चिंता देखील व्यक्त केली.
आयर्लंडच्या महासागर संशोधन आणि संवर्धन संघटना म्हणजेच ओसीआरएने यासंदर्भात माहिती दिली आहे. समोर आलेल्या लोककथेनुसार, ओअरफिश जपानच्या बेटांखाली राहतात. आणि ते लोकांना भूकंप होणार आहे याची चेतावणी देण्यासाठी पृष्ठभागावर येतात. 2011 मध्ये भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीमुळे फुकिशिमा अणुऊर्जा प्रकल्पात अपघात झाला होता. तेव्हाही या प्राण्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते असे म्हटले जाते.
अशा गोष्टींवर विश्वास ठेवणे योग्य नाही कारण त्याचा वैज्ञानिक आधार अद्याप सिद्ध होऊ शकलेला नाही, अशीही दुसरी बाजू याबद्दल सांगितली जाते. गेल्या महिन्यातही मेक्सिकोच्या समुद्रकिनाऱ्यावर असाच एक ऑरफिश दिसला होता. पण त्याची शेपटी गायब होती. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये अमेरिकेतील सॅन दिएगोमध्ये असाच एक प्राणी दिसल्याचे सांगितले जाते.