122 कोटींचा गैरव्यवहार, RBI अधिकाऱ्यांची चौकशी होणार? न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळाप्रकरणी सर्वात मोठी अपडेट

न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी सर्वात मोठी अपडेट  समोर आली आहे. या घोटाळ्यात आता RBI अधिकाऱ्यांचीही चौकशी होणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 19, 2025, 04:14 PM IST
122 कोटींचा गैरव्यवहार, RBI अधिकाऱ्यांची चौकशी होणार? न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळाप्रकरणी सर्वात मोठी अपडेट  title=

New India Co-operative Bank scam: न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. RBIच्या तपासणीदरम्यान मुख्य आरोपी हितेश मेहताने 122 कोटींचा गैरव्यवहार केल्याची कबुली दिली होती. आता या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळाप्रकरणी RBI अधिका-यांचीही चौकशी होऊ शकते. आर्थिक गुन्हे शाखा म्हणजेच ईओडब्ल्यूने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील कथित 'अनियमितता' चा तपास सुरू केला होता यानंतर हा सर्व घोटाळा उघडकीस आला होता.

NICB चा Former General Manager and Accounts head हितेश मेहता विरोधात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेचे तब्बल 122 कोटी रुपये रकमेचा अपहार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळाप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे RBI अधिका-यांच्या व्हिडिओचा पुरावा आहे, तो फॉरेन्सिक लॅबकडे विश्लेषणासाठी पाठवला जाणार आहे.

RBIच्या तपासणीदरम्यान मुख्य आरोपी हितेश मेहताने 122 कोटींचा गैरव्यवहार केल्याची कबुली दिली होती.   विशेष म्हणजे त्यावेळी RBI अधिका-यांनी त्यांच्या मोबाईलवर कबुलीजबाब नोंदवले होते.  आर्थिक गुन्हे शाखा म्हणजेच EOWनं व्हिडिओ पुरावे असलेले मोबाइल  जप्त करून ते प्रमाणीकरण आणि विश्लेषणासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.   हा व्हिडिओ तपासात महत्त्वपूर्ण पुरावा म्हणून काम करू शकतो. 

सूत्रांनी दिलेल्या माहिती प्रमाणे  फॉरेन्सिक तपासणी कबुलीजबाबाची सत्यता आणि व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड करण्यात आली आहे की नाही हे निर्धारित करण्यात मदत करेल.  त्याच बरोबर वेळ पडल्यास आरबीआयच्या अधिकाऱ्यांना त्यांनी  अनियमितता, त्यांनी घेतलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि हरवलेली रोकड का उघड केली नाही याबद्दल चौकशी सुद्धा करू असे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.