Bihar Viral Video : काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर बिहारचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत होता. या व्हिडीओमध्ये एक मुलगा डान्स करता करता आर्केस्ट्रामधील एका मुलीच्या भांगेत सिंदूर भरतो. यामुळे हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. या घटनेनंतर संबंधित मुलगा त्याच्या कुटुंबाबत तरुणीने दिलेल्या काही मुलाखती समोर येत आहेत. व्हिडिओनंतर तरुणाला आणि त्याचे कुटुंब सर्व त्या तरुणीपासून अंतर राखत आहेत. आर्केस्ट्रा गर्लचं म्हणणं आहे की चुकीने का होईना परंतु आता त्यामुलाचं माझ्याशी मग्न झालेलं आहे. आता तिला आयुष्यभर त्याच्या सोबत राहायचं असून ती त्या तरुणाला आपला पती मानते. परंतु आता तो तरुण त्या तरुणीकडे लक्ष देत नाहीये.
जेव्हापासून आर्केस्ट्रा गर्लला सिंदूर लावतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला त्यानंतर आर्केस्ट्रा गर्ल या संबंधित अनेक व्हिडीओ बनवत आहे. तसेच तिच्याकडे अनेक यूट्यूबर्सच्या रांगा लागल्या असून तरुणीच्या भांगेत सिंदूर भरणारा मुलगा सध्या गायब आहे. त्या मुलाचे नाव गुलशन यादव आहे. परंतु मागील तीन ते चार दिवसांपासून त्याची काहीच खबर नाही. तरुणी त्याच्याशी सतत संपर्क करण्याचा प्रयत्न करतेय तरी देखील त्याच्याशी संपर्क होत नाहीये. सध्या तरुण कोणाच्याही संपर्कात नसून गायब झाल्याची माहिती मिळते आहे.
हेही वाचा : शिवजयंतीच्या पोस्टमध्ये राहुल गांधींकडून घोडचूक; थेट कायदेशीर कारवाईचा इशारा
वीडियो में देखिए डांसर शादी से कितनी खुश है pic.twitter.com/xZpDd7pkAR
— ShivRaj Yadav (shivaydv) February 13, 2025
आर्केस्ट्रा गर्लच्या अनेक मुलाखती सध्या समोर येत आहेत. लोकल 18 ने घेतलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले की तरुण तीन ते चार दिवसांपासून गायब आहे. मुलीने सांगितले की मला माहित नाही तो कुठे गेलाय. त्या प्रोग्रामनंतर जवळपास एक आठवडा आमच्यात खूप बोलणं झालं, परंतु तो आता फोन उचलत नाही त्याचा फोन स्वीच ऑफ लागतोय. तरुणी पुढे म्हणाला की, 'गुलशन, माझं इथे रडून रडून हालत खराब झाली आहे. तू कुठे आहेस? सासरकडची लोकं माल ठेवण्यास नकार देतायत, मला कळत नाहीये की मी कुठे जाऊ. मला फोन कर प्लीज'.