PAK VS NZ : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारी पासून सुरुवात होत असून यातील पहिला सामना बुधवारी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड ( Pakistan VS New Zealand) यांच्यात खेळवला जात आहे. तब्बल 29 वर्षांनी पाकिस्तानात आयसीसी टूर्नामेंटचे आयोजन होत असून भारताचे सर्व सामने मात्र दुबईत खेळवले जातील. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफीला (Champions Trophy) सुरुवात झाली असून या सामन्याचा टॉस पार पडला. यात पाकिस्तानने टॉस जिंकला असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दुपारी 2: 30 वाजता पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्याला सुरुवात होणार असून कराची येथील नॅशनल बँक स्टेडियमवर हा सामना पार पडेल. पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला तर आतापर्यंत दोन संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तीन वेळा आमने सामने आले आहेत. 2000, 2006 आणि 2009 या वर्षी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात तीनही वेळा न्यूझीलंडनेच पाकिस्तानचा पराभव केलेला आहे. सामन्यापूर्वी दुपारी 2 वाजता टॉस पार पडला. यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीचे आव्हान दिले.
टॉस जिंकल्यावर पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान म्हणाला की, 'आम्ही प्रथम गोलंदाजी करू. आम्ही गतविजेते आहोत त्यामुळे जरा जास्त दडपण असेल, पण आम्ही याला मागील झालेल्या तिरंगी मालिकेप्रमाणे खेळू. पाकिस्तानात खेळणेही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. तसेच हरिस रौफ तंदुरुस्त झाला असल्याने त्याला प्लेईंग 11 मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे'.
फखर जमान, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार/ विकेटकिपर), सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद
डेव्हॉन कॉनवे, विल यंग, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकिपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, विल्यम ओरोरके