Asteroid 2024 YR4 : नासाचं संपूर्ण लक्ष सध्या एका लघुग्रहाकडे असून, या लघुग्रहाचा उल्लेख "city-killer" असा केला जात आहे. पृथ्वीवर हा लघुग्रह धडकणार असून, त्याची शक्यता आता 3.1 टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती नासानं प्रसिद्ध केली आहे. साधारण 177 फूटांचा व्यास (54 मीटर) असणाऱ्या या लघुग्रहाचा आकार एखाद्या इमारतीइतका असल्याचं सांगितलं जात आहे.
मानवी अस्तित्वाला या लघुग्रहाचा धोका नसला तरीही त्याच्या आदळण्यानं एखाद्या शहराचा नाश होईल असं लाईव्ह सायन्सनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. असं असतानाही संशोधक आणि अभ्यासकांनी मात्र ही सतर्कतेचा इशारा देण्याची वेळ नसून अद्याप तशी परिस्थिती उदभवली नसल्याचंही सांगितलं आहे. 'मी कोणालाही घाबरवत नाहीय' असं ब्रुस बेट्स एएफपीशी संवाद साधताना म्हणाले.
एका X युजरनं हा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास त्याचा कसा परिणाम होईल याचं काल्पनिक चित्रणही जगापुढे आणलं आहे. जी दृश्य पाहताना नेटकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय. Asteroid 2024 YR4 ची सर्वप्रथम नोंद 27 डिसेंबर 2024 मध्ये करण्यात आली होती. चिलीतील El Sauce Observatory नं ही बाब हेरली होती. ज्यानंतर IAWN अर्थात इंटरनॅशनल अॅस्टरॉईड वॉर्निंग नेटवर्कनं जानेवारी महिन्यात मेमो वॉर्निंग जारी करत या धूमकेतूच्या आदळण्याची शक्यता 1 टक्क्याहून अधिक असल्याचं सांगितलं होतं.
NEW: NASA has increased the chance a major asteroid smashes into Earth in 2032, now giving it a 3.1% chance, up from 2.6% last week.
NASA says the odds the asteroid hits Earth is 1 in 32. It is big enough to wipe out an entire city.
The large cities with the highest risk are… pic.twitter.com/WHVsiGsieT
— Collin Rugg (@CollinRugg) February 18, 2025
दरम्यान, काही तज्ज्ञांच्या मते हा धूमकेतू पृथ्वीवर आदळणारच नसल्याची 96.9 टक्के शक्यताही आहे. यासंदर्भातील आणखी एक शक्यता म्हणजे YR4 हा धूमकेतू पृथ्वीऐवजी चंद्रावर आदळू शकतो. त्यामुळं आता नासा आणि जगभरातील इतरही अंतराळ संशोधन संस्था याच लघुग्रहावर लक्ष ठेवून असल्याचं पाहायला मिळत आहे.